वाडीत दोन हजार मास्क व सॅनिटायझरचे वितरण
नागपूर/ अरूण कराळे (खबरबात)
चिननिर्मीत कोरोना विषाणू रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे चेहर्याला मास्क लावणे. त्यामुळे मोठय़ा संख्येत नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक आदी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावून स्वत:ची सुरक्षा करीत आहे . मेडिकल दुकानात मास्कची किंमत ३० रुपये ते २०० रुपयापर्यंत आहे . गरीब नागरीकांच्या हाताला काम नाही . त्यामुळे मास्क व सॅनिटाझर घेण्याची गरीब कामगारांची ताकद नाही.हाच दृष्टिकोन समोर ठेवून मास्क व सॅनिटायझरचे वितरण केल्याचे माजी न. प. सभापती सरीता यादव यांनी सांगीतले.
वाडी येथील शिवशक्ती नगरमधील वेणा जलाशय परिसरातील नवीन क्रिडा संकूल मध्ये भाजपाच्या सरीता यादव यांच्या तर्फे मंगळवार १९ मे रोजी दोन हजार मास्क व इतर साहीत्याचे वितरण आमदार समीर मेघे यांच्या हस्ते महीला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख राजूताई भोले , महीला आघाडी वाडी मंडळ अध्यक्ष ज्योती भोरकर , माजी न. प. उपाध्यक्ष नरेश चरडे ,भाजपा वाडी शहर अध्यक्ष केशव बांदरे , माजी न. प. सभापती सरीता यादव ,माजी न. प. सभापती कल्पना सगदेव , माजी नगरसेवक राकेश मिश्रा ,सामाजिक कार्यकर्ते रामसिंह यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आले .
नागरिकांना आवश्यक सेवा हेतू कर्तव्य निभावत असणारे पोलिस कर्मचारी, यातायात कर्मचारी, ट्रक, ऑटोचालक, नगर परिषदेचे सफाई कर्मचारी आदींना मास्कची अत्याधिक आवश्यकता आहे. याचे महत्त्व समजून सामाजिक दृष्टिकोनातून सरीता यादव यांनी मास्क व इतर साहीत्य वाटून समजाप्रती आपलेही काही देणे लागते हीच भावना लक्षात ठेवल्याचे आमदार समीर मेघे यांनी मार्गदर्शनातून सांगीतले .
कोरोना रोगप्रतिकारक यंत्रणेवर हल्ला करते .म्हणूनच, काहींमध्ये हा रोग न्यूमोनिया, बहु-अवयव निकामी होऊन मृत्यूपर्यंत देखील जाउ शकतो. खोकताना, शिंकताना संक्रमित व्यक्ती सारखीच श्वास घेताना श्वसनाच्या थेंबांद्वारे संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो . कोरोनाचा नायनाट करण्यासाठी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन माजी न. प. उपाध्यक्ष नरेश चरडे यांनी केले.
यावेळी प्रविण महल्ले ,विनोद मिश्रा ,भुषण रागीट ,प्रफुल कौरती ,अतुल खाडे उपस्थित होते .