खरे लाभार्थी योजनेतून वंचित
मुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
नागपूर/ अरूण कराळे (खबरबात)
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशातील संपूर्ण राज्यात लॉक डाऊन जाहीर केल्याने सर्वत्र कामकाज ठप्प होऊन गोर-गरिबांची आर्थिक बाजू पूर्णपणे ढासळून जाऊन दोन वेळेचे जेवण मिळणे कठीण झाले असतांना राज्यातील कामगार सर्वसामान्य नागरिक उपाशीपोटी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने तहसीलदार मार्फत पाठवीत आलेल्या राशन किट वाटपात हेतुपुरस्सर मोठा घोळ होऊन या गरीब गरजूवंताना नगर परिषद कर्मचाऱ्यांने जाणूनबुजून हा प्रकार करीत शासनाच्या योजनेतून वंचित ठेवून ज्यांची आर्थिक स्थिती सक्षम आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
वाडी नगर परिषदेच्या वतीने स्थानिक आंबेडकर नगर मधील वॉर्ड क्रमांक २१ ते २५ मध्ये शिधा पत्रिका नसलेल्या गरजू कुटुंबाचा सर्वे करून संबंधित यादी तहसील कार्यालयात ३७१ कुटुंबियांची यादी पाठविण्यात आलेली होती त्यातील जवळपास १०० लोकांना राशन किट मिळाली नसून या भागाचा सर्वे करणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्याने एका दुकानात बसून यादी बनविली असून आशा वर्करच्या स्वतः सह्या केल्याचीही परिसरात चर्चा असल्याने आपल्या जवळच्या लोकांना या योजनेचा लाभ कसा देता येईल हा दृष्टिकोन समोर ठेऊन हेतुपुरस्सर यादी तयार करण्यात आल्याने फार मोठा घोळ निर्माण होऊन खरे गरजुवंत शासनाच्या योजनेतुन वंचित राहीले आहे . हा घोळ त्वरित दुरुस्त करून खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी बुधवार २० मे रोजी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,दत्ता वानखेडे,राजू खोब्रागडे, विजय नंदागवली,अवधूत रंगारी,ललित डहाट आदींनी निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.या निवेदनाची प्रतिलीपी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत ,अन्ननागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ ,आमदार प्रकाश गजभिये ,जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे ,नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन ठाकरे ,वाडी न. प.च्या प्रशासक इंदीरा चौधरी यांनाही देण्यात आले.