चंद्रपुर (खबरबात):
●चंद्रपुरात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला
●एकून रुग्ण संख्या 3
●चंद्रपूर शहराजवळ असणाऱ्या दुर्गापूर परिसरातील रुग्ण पॉझिटिव्ह
●55 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
●हैदराबाद येथून आला होता हा व्यक्ती
●कुटुंबातील पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते.
●त्यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
●अन्य सदस्यांच्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत ●पहिल्या कोरोना बाधित रुग्णाच्या 16 व 17 मे रोजी कोरोनासंदर्भातील दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने रुग्ण झाला कोरोनामुक्त
चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, पंचशील नगर या परिसरातील एक 55 वर्षीय नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिले आहे.
दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गापुर परिसरात हैद्राबाद येथून 13 मे रोजी एक युवती चंद्रपूर येथे परत आली. या युवतीला इंस्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ( संस्थात्मक अलगीकरण ) करण्यात आले होते. मात्र ही युवती कुटुंबाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून 18 मे रोजी कुटुंबातील सहाही सदस्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले.
आज ६ पैकी ४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या चार अहवालात 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हैद्राबादवरून आलेली मुलगी, आई, अडीच वर्षाच्या छोट्या मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह आहे.
या सहा पैकी आणखी दोन अहवाल प्रतीक्षेत आहे. 55 वर्षीय व्यक्तीमुळे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.