येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला, ता. ०४ : तालुक्यातील खरवंडी येथील शेतकरी माणिक मोरे यांच्या घराला अचानक आग लागून घर व घरातील सर्व संसार उपयोगी वस्तु आगीत जळून भस्मसात झाले आहे दि.२ मे रोजी दुपारी 3:30 वाजता अचानक आग लागली होती . मात्र आगीचे कारण समजले नाही यामध्ये या जोडप्याकडे असलेले 4000 हजार रोख तसेच 5 पोते गहू, बाजरी 4 पोते ,भुईमूग 5 पोते, व घरातील सर्व भांडी जळूनखाक झाली आहे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये किंमतीचे आगीत नुकसान झालेले आहेत. घटनास्थळी जाऊन तलाठी राजू काळे यांनी पंचनामा केला आहे .महत्वाचं म्हणजे हे जोडपे 75 वयाच्या पुढचे आहे सदर जोडप्याला कुठलाही आधार नाही. ही बातमी परिसरात कळताच उपसभापती भाऊसाहेब गरूड यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत करण्याचे अश्वासन दिले आहे तसेच राजापूर येथील शिवकृपा इणडेन गॅस चे वितरक समाधान चंद्रभान चव्हाण यांनी या वयोवृद्ध जोडप्याला रोख पाच हजार शंभर रुपये आर्थिक मदत व संसार उपयोगी वस्तु देऊन मदत केली.
व स्वयंपाकासाठी गॅस कनेक्शन शेगडी भांडे अशी मदत समाधान चव्हाण यांनी दिली आहे. संकट परिस्थितीत हातभार लावणे ही एक प्रकारची सहकार्याची भावना व्यक्त केली आहेत आशा प्रकारची मदत मिळावी असे आव्हान खरवंडी चे पो पाटील किशोर झाल्टे व सरपंच दसरथ मोरे यांनी केले आहे . तसेच शासनाने लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे यावेळी.दिपक जगताप, भाऊसाहेब गरुड, दत्तू वाघ, राजापूरचे माजी उपसरपंच काशिनाथ चव्हाण, राजापूर विकासोचे माजी चेअरमन बबनराव वाघ, अनिल बैरागी,घमाजी गुडघे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.