येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला, ता. ०४ : कोरोनाच संकट संपुर्ण जगासह देशावर असल्याने देशात तसेच राज्यात लॉकडाउन सुरु आहे.त्यामुळे शाळांना सुट्टया जाहिर करण्यात आल्या असल्याने झाडांना पाणी मिळत नसल्याने कोरोनाचे परिणाम नागरिकांबरोबर शाळेतील झाडांनाही भोगावे लागत आहेत.
असेच परिणाम येवला तालुक्यातील गारखेडा येथील शाळेतील झाडांना पाण्याअभावी भोगावे लागत होते.गारखेडा शाळेत लोकसहभागातून झाडे लावली होती.जो पर्यंत शाळा सुरु होती तो पर्यंत मुलांनी हात पंपावरून पाणी आणून झाडांना टाकुन झाडे वाढविली होती.पण सद्या कोरोना प्रदुर्भावामुळे गेली दीड महिन्यापासुन शाळा बंद आहेत.यामुळे झाडांना पाणी मिळत नाही.तसेच सध्या ऊनाचा कडाका वाढला असल्याने ऊनामुळे तसेच पाण्याअभावी झाडे सुकुन चालली होती.यामुळे शाळेचे मुख्याध्यापक संदीप वारुळे यांनी वॉट्सपच्या माध्यमातुन गावकर्यांना झाडांना पाणी देण्याबाबत आव्हान केले होते.यावर गावातील जागृत नागरिक तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खैरनार, सदस्य संदिप खैरनार, संजय खैरनार आदींनी त्याला तात्काळ प्रतिसाद देत पाण्याच्या टाकीमधून दररोज पानी आणुन स्व:ता तिघे पन पानी घालत आहे आठ दिवसांपासून झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली आणि पाऊस पडे पर्यंत झाडांना पाणी देणार असल्याची ग्वाही देवुन अनमोल कार्य हाती घेतले.यामुळे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय खैरनार यांनी तसेच गावकर्यांनी त्यांचे आभार मानले.