गौतम धोटे/ आवारपूर
कोरपना संपूर्ण देशात कोरोना वायरसने थैमान घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे यावर प्रतिबंध म्हणून केंद्र व राज्यसरकारने संपूर्ण देशात संचारबंदि लागू केली आहे मात्र हातावर पोट असणारे व गरीब जनता मात्र हतबल झाली आहे दोन वेळच्या जेवणाविणा उपासमारीचा सामना करतांना कित्येक कुटुंब समाजात आपल्याला दिसून येत आहेत याची दखल घेत मनसे महिला सेना बल्लारपूर तालूका अध्यक्ष सौ.कल्पनाताई पोर्तलावार यांनी स्वखर्चातून गरजू व गरीबकुटुंबाना भाजीपाला आणि किराणा देवून मानूसकि जोपासली कल्पनाताईंनी समाजापूढे एक आदर्ष ठेवला असून मनसे सामाजीक कार्यात सदैव अग्रेसर असते हे एकदा दाखवून दिले मनसे महिला तालूका अध्यक्ष कल्पनाताई पोर्तलावार यांच्या या कार्याने अनेक कुटुबांना आधार मिळाला असून त्यांच्या परीवाराला दिलासा मिळाला आहे.