जुन्नर /आनंद कांबळे
लाँकडाऊनमुळे अडचणीत असणाऱ्या कुटुंबांना जुन्नर तालुक्यातील शिक्षकांनी मोठा आधार दिला आहे. आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ५२७० कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप गरजू कुटुंबियांना करण्यात आले.
जुन्नर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांना जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी मदतीसाठी आवाहन केले होते.
त्याला प्रतिसाद देत जुन्नर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मदत निधी उभा केला. एकूण ८६३ प्राथमिक शिक्षकांनी प्रत्येकी सातशे रुपयांचा
निधी उभा केला तसेच ७१३ माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील मदत केली. एकूण
१२,०२,२०० रुपये एवढा निधी चार दिवसात गट शिक्षणाधिकारी पी.एस. मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली
केंद्रप्रमुखांनी जमा केला.
यामध्ये शिक्षकांच्या वतीने ४७७० किट आणि आमदार अतुल बेनके यांच्या वतीने आणखी ५०० किट असे एकूण ५२७० कुटुंबांना पाच किलो तांदळ व पाच किलो गहू असे दहा किलोचे किट चे वाटप करण्यात आले.
सदर किटचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण आज रविवारी, आमदार अतुल बेनके, सभापती विशाल तांबे यांच्या हस्ते कांदळी गावामध्ये पाच कुटुंबांना करण्यात आले.
यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर , गटविकास अधिकारी विकास दांगट, गट शिक्षण अधिकारी, पी एस मेमाणे व तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अशाप्रकारे तालुक्यातील शिक्षक संघटनांनी स्वच्छेने मदत निधी उपलब्ध करून गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करणारा राज्यातील जुन्नर हा पहिला तालुका ठरला आहे. यामध्ये पुढील शिक्षक संघटनांचा सिंहाचा वाटा आहे.
०१. जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ
०२. जुन्नर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटन
०३. जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समिती
०४. जुन्नर तालुका अखिल प्राथमिक शिक्षक संघ
०५. जुन्नर तालुका महिला शिक्षक आघाडी
०६. जुन्नर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ
०७. जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षक संघटना
०८. जुन्नर तालुका माध्यमिक टी. डी.एस. संघटना
०९. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जुन्नर
१०. जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना,
११. केंद्रप्रमुख शिक्षक संघटना जुन्नर