Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे ११, २०२०

तुम्ही जर अन्य जिल्ह्यात अडकले असाल आणि तुम्हाला घरी जायचे असेल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे

Love under lockdown: The couples pushed together and kept apart by ...
नागरिकांनी फक्त ऑनलाईन अर्ज करावा
चंद्रपूर:
 लॉकडाऊनच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात व परिसरात अडकलेल्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाणाऱ्या व्यक्तींनाच उदा. अंत्यविधी, अत्यावश्यक वैद्यकीय कामांसाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रवास करण्यास परवानगी व ई-पास दिली जाणार आहे.

जाणून घेऊया कशासाठी, कशी मिळणार परवानगी
जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी शक्यतो http://covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन विचारलेली आवश्यक माहिती भरावी. अर्ज भरताना अर्जासोबत स्वतःचा फोटो, ओळखपत्र व वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात अथवा राज्यात जायचे असल्यास तेथील सक्षम अधिकारऱ्यांची परवानगी घेऊनच जिल्ह्यात प्रवेश करणे आवश्यक आहे.

प्रवास करताना दुचाकी वाहनावर केवळ 1 व्यक्तीला परवानगी राहील तसेच चारचाकी वाहनांमध्ये चालका व्यतिरिक्त इतर 2 व्यक्ती म्हणजेच 3 व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. मोठ्या वाहनांमध्ये प्रवास करीत असताना 50% एवढीच प्रवासीची मुदत राहणार आहे. ज्यांना खरोखरच आवश्यकता आहेत अशा व्यक्तींनीच अर्ज करावा अन्यथा करू नये. ही परवानगी ऑनलाईनच मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना मात्र अन्यत्र जाण्यास परवानगी नाही.
खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे
तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी, तालुका प्रशासनाशी संपर्क साधने सर्वात आवश्यक आहे.ज्या जिल्ह्यात अडकले आहात ते जिल्हा प्रशासन आपल्यावतीने चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधनार आहे. संपर्क झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात त्या जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाला प्रवास परवानगी विषयी कळविण्यात येईल. तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल.(त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यात अडकला आहात, तेथील जिल्हा अथवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्हाशी थेट संपर्क साधला तरी परवानगी देणे शक्य होणार नाही.) परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तेथील प्रशासनाच्या परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हा नियंत्रण कक्ष,
 जिल्हाधिकारी कार्यालय, 
चंद्रपुर संपर्क क्रमांक जारी
07172-274166, 07172-274167, 07172-274168, 07172-274169, 07172-274170, 07172-274171, 07172-274172, 07172-274173, 07172-274174, 07172-274175 हे संपर्क क्रमांक 24 तास सेवा देणार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.