उदगीर:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळाती ल शेतीच्या खरीप हंगामात खते,बि बियाणे वेळेत व शेतकऱ्यांना बाधांवर उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश उदगीरचे आमदार तथा राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा,राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
खरीप हंगामसाठी उपलब्ध असलेल्या खते , बि बियाणे यांचा साठा पुढील काळात करण्यात येणारा पुरवठा या बाबत उदगीर येथे आढावा बैठक राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, बस्वराज पाटील नागराळकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण कृषी अधिकारी महेश तीर्थकर, तालुका कृषी अधिकारी सिध्देश्वर मोकळे, तालुका कृषी अधिकारी सातपुते, कल्याण पाटील, सिद्धेश्वर पाटील, यांच्या सह कृषी सहाय्यक, शेतकरी व कृषी साहित्य विक्रेते उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आगामी काळात आपल्या गावातच,बाधांवर बी बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी वितरणाचे योग्य नियोजन करण्यात यावे दहा गावासाठी एक कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांची नेमणूक करावी, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या मागणी नुसार पुरवठा करावा. तसेच आगामी काळात शहरात दाखल होणारा बी बियाणे,खते याचा साठ्याच्या वितरण व वाहतूक बाबत तालुका कृषी अधिकारी यांनी पोलीस प्रशासन, व महसूल प्रशासन यांच्या सोबत समन्वय ठेवावा. आगामी काळातील खते ,बियाणे यांच्या पुरवठया बाबत महाबीज व खाजगी कंपन्या यांच्या सोबत संवाद साधून मागणी नुसार आवश्यक असलेले बी बियाणे उपलब्ध करून घ्यावे.अशा सुचना यावेळी देण्यात आल्या कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना मदतीसाठी अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.