जिल्हाधिकाऱ्यांचा सुधारित आदेश
विदेशी घरीच मिळणार ऑनलाइन
नागपूर/ अरूण कराळे (खबरबात):
येथील मद्याची दुकाने सुरू होताच मद्यपिंची झालेली गर्दी पाहता तसेच नागपूर शहरातील ग्राहकांचा दारू विकत घेण्यासाठी आलेला लोंढा याचा दुष्परिणाम पाहता कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी नागपूर यांनी सुधारित आदेश काढत विदेशी दारूचे दुकाने बंद केल्याने तळीरामाची एकप्रकारे पंचाईतच झाली.
नागपूर पोलीस आयुक्तलयाच्या अंतर्गत येणाऱ्या हिंगणा,कामठी,कोराडी तसेच वाडी या चार शहरातील मद्याची दुकाने जिल्हाधिकारी यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु दुकाने सुरू होताच कित्येक दिवसापासून दारूच्या प्रतीक्षेत असलेल्या मद्यपिनी दारू खरेदी करण्यासाठी सकाळ पासून दुकानासमोर रांगा लावून शारीरिक अंतराचा फज्जा उडविल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी त्वरित दुसऱ्या दिवशीपासून दुकाने बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केला.
त्या आदेशानुसार ऑनलाइन सेवा अर्थात घरपोच मद्य सेवा मिळणार आहे.यामुळे पुन्हा एकदा मद्यपींच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. कारण होम डिलिव्हरी मागून घेण्यासाठी अनेकांची तयारी दिसत नसून दोन ते तीन तास रांगेत उभे राहून मद्य विकत घ्यायची तयारी असल्याचे बोलून दाखवीत आहे.शहरातील देशी दारूचे दुकाने चालू असली तरी विदेशी दारूच्या दुकानात उसळलेली गर्दी भट्टीवर दिसत नाही.तर दुसरीकडे ऑन लाईन दारू विक्रीचा जिल्हाधिकारी यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचाही अनेकांचे मत आहे.