कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमूळे अनेक कुटुंब संकटात सापडले आहे. अशात निराधार व विधवा महिलांना चंद्रपूर महानगर पालिकेने मदतीचा हात पूढे करत त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त यांना देण्यात आले आहे.
कोरोनाच्या जागतीक संकटवार आढा बसविण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत रोजंदारी करणा-या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरातील निराधार, विधवा व घटस्पोटीत महिलांना कोणाचाही आधार नसतांना त्या रोजंदारीवर काम करुन आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होत्या मात्र संचाबंदीमूळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
विविध सामाजीक संघटनांकडून राशन व धान्य वाटप केल्या जात असले तरी ते शिजवण्यासाठी पैसे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामूळे निराधार व विधवा महिलांच्या कुटुंबियांचा विचार करून महानगरपालिकेव्दारे या महिलांना आर्थिक मदत देण्यात यावी अषी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
या आधी आपल्या चंद्रपूर महानगरपालिके मार्फत अपंग व्यक्तींना 2 हजार रुपयाची मदत करण्यात आली आहे. आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या संकटसमयी निराधार महिला कुटुंबियांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनाही ताक्ताळ आर्थिक मदत करावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.