आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार
उपमहापौर राहुल पावडे यांचा पुढाकार
चंद्रपुर/प्रतींनिधी:
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. अनेक नागरिक विविध संकटाचा सामना करीत आहे कामगारांचे परिवार आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी सुध्दा अडचणीत सापडलेले दिसत आहेत. राज्याचे माजी अर्थ मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मदत मोहीम सक्रिय पद्धतीने चंद्रपूर शहरात राबविली जात आहे. चंद्रपूर ला सुद्धा आंध्र प्रदेश ,तेलंगणा,व इतर राज्यातील शिक्षणा करिता आलेल्या विद्यार्थ्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे
प्राप्त होताच कुठल्याही प्रकारचा विलंब न करता अशा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट उपमहापौर राहुल यांनी घेतली व त्यांची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली व त्यांच्या मदती करिता पुढे आले त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही असे विद्यार्थी मित्रांना त्यांनी सांगीतले. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर ही माहीती श्री. राहुल पावडे यांनी घातली.
आ. मुनगंटीवार यांनी त्वरित सदर विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे निर्देश त्यांना दिले त्यानुसार सदर विद्यार्थ्यांना जिवनाश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना कोणतीही कमतरता भासु देणार नाही अशा शब्दात राहुल पावडे यांनी आश्वस्त केले धीर दिला.