Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०२, २०२०

येवला शहरात शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र




येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: येवला येथे शिवभोजन थाळी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंग पाळत भोजनाचे पाकीट देण्यात आले.
येवला शहरात शासनाच्या वतीने शिवभोजन थाळी केंद्र या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील मुख्य भाग असणाऱ्या जुन्या पंचायत समितीसमोर विंचूर रोड येथे श्री महालक्ष्मी बहुउद्देशीय महिला बचत गटाच्या वतीने, तर संजीवनी मजूर सहकारी संस्थेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाजवळ फत्तेबुरूज नाका येथे हे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात हे केंद्र सुरू राहणार आहे. यावेळी तहसीलदार रोहिदास वारूळे, बाळासाहेब लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, प्रवीण पहिलवान, श्याम तांबे, सचिन सोनवणे, विनोद पाटील, गोटू मांजरे आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.