कोरोना रोखण्यासाठी केली गावात जनजागृती
नागपूर : अरूण कराळे:
तालुक्यातील खडगाव ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बुधवार १ एप्रिल पासून संपूर्ण परिसरात सोडीयम हायड्रोक्लोराइड युक्त औषधीची फवारणी केली जात आहे .सोबतच कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जनजागृती सुरु असल्याची माहिती माजी सरपंच देवराव कडू यांनी दिली. गावातील मुख्य रस्त्यावर,किराणा दुकान तसेच गर्दी जमलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायड्रोक्लोराइड ची फवारणी करण्यात आली.
खडगाव ग्राम पंचायत कोरोनाचा पराभव करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे याचाच भाग म्हणुन परिसरातील अस्वच्छ भागात जंतुनाशक पावडर टाकण्यात आले. बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तींची माहिती शासनाने दिलेल्या वेबसाईटवर ग्रामपंचायत वेळोवेळी पाठवीत आहे व त्यांना घरातच थांबविण्याचे निर्देश देण्यात देत आहे.
कोरोना विषाणूचा पराभव करण्यासाठी सरपंच रेखा मून, उपसरपंच किशोर सरोदे, सचिव सुनील जोशी ,देवराव कडू , शितल उईके,सरला कडु, संघमित्रा गव्हांदे, वंदना महल्ले, रेणूका गोमकार, ज्योती ठाकरे, संगीता खुसपरे , मनोज कडु , चंद्रशेखर गणवीर, गोपाल ताकीत ,गणेश रहांगडाले आदी प्रयत्न करीत आहे .