येवला अंदरसुल बाजार समितीत शेतकऱ्यांना फटका!
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: दि.०३; अंदरसुल परिसरात ४५ ते ५० किलोच्या कांदा बारदाणाची किंमत गेल्या आठवड्यात प्रती बारदान गोणी दर २५/२८ रुपये होता तर तोच दर ४५/५० रु इतका दुप्पट झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे,कारण कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर गावातील मजूर तुटवडा /मालवाहतूक वाहन लोडिंग अनलोडिंग आशा अडचणींवर मात करण्यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत कांदा या शेत मालाचा लिलाव गोणीमध्ये शुक्रवार दि.०३ एप्रिल २०२० पासुन येवला बाजार समितीत व उपबाजार समिती अंदरसुल येथे सुरू होणार आहे. कोणत्याही प्रकारचा मोकळा स्वरूपात आलेला कांदा स्वीकारला जाणार नसल्याचे समितीने ठरवले आहे, लिलाव फक्त एक सत्र सकाळी १० ते ०१ वाजेपर्यंत वाहनांच्या ५ फूट अंतरावर असलेल्या स्वरूपात घेण्यात येणार आहे,तसेच समितीने कांदा ज्यूट बारदान ४५/५०किलो च्या गोणी ची अट घालुन प्लास्टिक गोणी नाकारली आहे,व मालाचा दर्जा व प्रतवारीत होणारे वांधे या मुळे शेतकऱ्यांचा फेरलीलाव करण्यात येणार आहे.परंतु या सर्व निर्णया मुळे सर्वात मोठी समस्या कांदागोणीची निर्माण आहे.कांदा लिलावासाठी शेतकऱ्यांना कांदा ज्यूट बारदान सांगीतल्याने कांदा गोणी चा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आगीतून निघून फुफाट्यात पडल्या सारखे झाले आहे.कारण
लासलगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गोणीबारदान खरीदी-विक्री केली जाते,परंतु तिथे परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिसरात लॉकडाऊन झाल्यामुळे जे कांदा बारदान २५/२८ रु दराने मिळत होते ते आता ४५/५० रु दराने शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत आहे,ते सुद्धा पुरेसे प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे.
"या वर्षी कोरणा वायरस मुळे आम्हाला कांदे बारदनाच्या गोनिची किमत ही 45 ते 50 रुपये दुपटीने मोजवी लागत आहे अधिच आवकाळी पाउसांमुळे कांद्याला उत्पादनाला मोठा फटका सहन करावा लागला आहे त्यातच आता कांदा गोणी चे भाव वाढल्याने मोठे संकटांना सामोरे जावे लागत आहे".
- इंजि. विजय खैरनार कांदा उत्पादक शेतकरी, गारखेड़ा.