राजापूर, ममदापुर परिसरात समस्या
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : राजापूर व ममदापुर परिसरात हरीण, काळविटांची अन्न आणि पाण्याच्या शोधात फिरत असतांना संघर्षाची झुंज सध्या पाहायला मिळत आहे.....सध्या एकतर उन्हाची कडक ताप पडत आहे त्यामुळे जंगलात त्यांना आपली भूक भागविण्यासाठी हिरवं गवत लागत मात्र हिरवे गवत तर कुठेही राहिलेले नाही....एकतर वन्यक्षेत्राच्या काही भागात पिण्यासाठी पाणी नाही.त्यामुळे हरीण, सध्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे फिरत आहे.अन्नपाण्याचा शोध करत फिरत असतांना...शेतकऱ्यांनी पाण्याच्या तुटवडा असतांना देखील हाल अपेष्ठा सहन कुठेतरी शेतात..शेतकऱ्यांनी दोन पाच गुंठे पीक जगवलेलं आहे...ते पीक खाण्यासाठी त्यांच्या हरीण आणि काळवीट यांची संघर्षाची लढत होत आहे...हरीण काळवीट लढत असतांना जोर-जोराच्या धडकेत शिंगेही तुटले जातात...परिणामी घायाळ होत असतात.. ममदापुर परिसरात नुकताच एक दिवसापूर्वी कुत्र्यांनी हल्ला केल्याने गरोदर हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे...अशी घटना नेहमीच चालू झाल्या आहे हरणांमध्ये लढत चालू असतांना...चरत असतांना कुत्री अचानक हल्ला करतात..काही प्रमाणात जखमीही करतात....तर कधी-कधी मृत्यूमुखीही पडतात..काही पाण्याच्या शोधात विहिरीत पडतात तर..काहीवेळा कुत्री मागे लागल्यामुळे हरणे आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैर पाळता त्यामुळे विहिरीतही पडतात...याभागात आठवड्यात दोन ते चार घटना सतत घडत असतात... काही वेळा हरणे वाचतात तर काही वेळा मृत्युमुखी पडतात आशा बरेच घटना राजापूर व ममदापुर परिसरात घडताय...या दोन हरणाची झुंज सुरू होती तेवढ्यात कुत्रे मागे लागल्याने झुंज सुटली....ममदापुर वनसंवर्धनात हरणांची संख्या मोठया प्रमाणात आहे.वनसंवर्धनाजवळ असलेले गावे राजापूर,ममदापुर,देवदरी, रेंडाळे,कोळगाव, सोमठाणजोश,पन्हाळसाठे, आदी गावे जवळ आहे..त्यामुळे उन्हाळा लागला कि अन्न पाण्यासाठी या गाव-वस्तीकडे धाव घेतांना दिसून येतंय....