तळवाड़े येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप आरखड़े यांच्या वतीने उपक्रम
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : सध्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे जे थैमान सुरू आहे त्यावर मात करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा चांगले काम करत असून आपल्या कुटुंबाचा विचार न करता आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी आपले काम चोखपणे प्रामाणिक सांभाळत आहे. आरोग्य कर्मचारी यांना तर या आजाराशी येणारे संपर्क मोठ्या प्रमाणात असू शकतात त्यामूळे त्यांना काळजी घेणे आवश्यक आहे.यामुळे या सर्व सेवकांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक भावनेतून युवा शेतकरी सामाजिक कार्यकर्ते संदिप आरखडे यांनी तळवाड़े शिवाजीनगर ,पिंपळखुटे ,डोंगरगाव येथील धरणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रोजगरांसाठी सर्व आदिवासी कुटुंब गावी आले आहे आर्थिक स्थिती हलाखीचीतर आहेच तर शिवाय स्वच्छतेची पन समस्या आहे अशा परिस्थितीत गरजू दुःखीत पीडित आदिवासींना मास्क, सॅनेटायझर, व हॅन्डक्लोज चे वाटप घरोघरी जाऊन तर केलीच शिवाय हात धुण्याचा तसेच करुणा बाबत जनजागृती अगदी शिस्तपणे केली तसेच सामाजिक भावना देखील व्यक्त केल्या आहेत शिवाजीनगर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉगडाउन मुळे विलास बांगर यांनी निराधार कुटुंबाला धान्य वाटपाबरोबर भाजीपाला वाटप केले होते, लागोपाठ मिळणाऱ्या अनपेक्षित मदतीमुळे बेरोजगार कुटुंबांना थोडाफार का होईना दिलासा तसेच कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी जागृत निर्माण होत आहे याचा आढावा घेत हा उपक्रम हाती घेतला आहेत असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले यामुळे त्याचे सर्व स्तरावरन कौतुक होत आहे.
या वेळी मा.सरपंच बाबासाहेब आरखडे, मोतीराम पवार, दत्तू गायकवाड, गणेश आरखडे, राजेंद्र आरखडे, पंकज आरखडे, मच्छिंद्र आरखडे, आदी उपस्थित होते.