Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २०, २०२०

कोलाम विकास फाऊंडेशनला 'नाम' चे पाठबळ




आणखी तीनशे कोलाम कुटूंबांना बुधवारी खाद्य सामुग्रीचे वाटप


राजुरा : 'लाँकडाऊन' दरम्यान माणिकगड पहाडावरील चारशे कोलाम कुटूंबांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर कोलाम विकास फाऊंडेशनच्या पाठीशी शेतकरी संघटना, फ्रेन्डस् स्पोर्टींग क्लब, वेकोली अधिकारी-कर्मचारी यांचेसह शेकडो हात मदतीला आले आणि अती दुर्गम भागातील चारशेहून जास्त आदिम कोलाम कुटूंबांपर्यंत खाद्य सामुग्री पोहोचवून त्यांना धीर देण्याचे कार्य कोलाम विकास फाऊंडेशनने केले.

आणखी बरेच कुटूंब या मदतीपासून वंचित राहत असल्याची खंत मनात खदखदत असतानाच सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांनी आदिम कोलाम कुटूंबांना मदत करण्याचा निर्णय घेऊन कोलाम विकास फाऊंडेशनला पाठबळ दिले. तिनशे कोलाम कुटूंबांसाठी मदतीचा हात घेऊन महाराष्ट्रातील नामवंत संस्था 'नाम फाऊंडेशन' पुढे सरसावली असून मा. नाना पाटेकर आणि मा. मकरंद अनासपुरे यांचे मार्गदर्शनाखाली व मा. हरिष इथापे यांचे सहकार्याने येत्या बुधवारला सिंगारपठार, थिप्पा, धनकदेवी, भूरी येसापूर, टाटाकोहळ, बापूरावगुडा, लांबोरी, येल्लापूर, गुडशेला, नोकेवाडा या कोलाम गुड्यांवरील सुमारे तिनशे आदिम कुटूंबांना जीवनावश्यक सामुग्रीचे वाटप करण्यात येणार आहे.

या मोहीमेचे नेत्रुत्व शेतकरी नेते अँड. वामनराव चटप, कोलाम विकास फाऊंडेशनचे विकास कुंभारे, फ्रेन्डस स्पोर्टींग क्लबचे पंढरीनाथ बोंडे, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे धिरज मेश्राम, वेकोली कर्मचारी बिंदूसार गजभिये, जेकब साळवे हे करणार आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी अन्य कार्यकर्ते व अधिकारी वितरण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
शासकीय नियमांची पुर्तता करून आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.