संकट ग्रस्तांना घरपोच आधार
नागपूर : अरूण कराळे:
रायपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील गोर गरीब, हातमजूरी करणारे, वयोवृद्ध व्यक्ती असे कोणीही संचारबंदी दरम्यान उपाशी राहू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.
सध्या जगात आणि देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे यावर मात करण्यासाठी सरकारने संपूर्ण टाळेबंदी लागू केली. त्यामुळे अनेक व्यापार व उद्योगधंदे बंद आहे .त्यामुळे मोल मजुरी करून हातावर पोट भरणारा वर्ग मोठ्या संकटाचा सामना करीत आहेत. मजुरी अभावी अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अश्या संकट काळात माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग हे गोर गरिबांच्या मदतीला धावून आले त्यांनी रायपूर जिल्हा परिषद मतदार संघात रायपूर, किन्ही धानोली, खैरी पन्नासे (नवीन ) खैरी पन्नासे (जुनी )गिरोला, मंगरूळ, नीलडोह (पन्नासे )मांगली, जुनेवानी, उखळी सावंगी, देवळी, आमगाव, सुकळी (घारपुरे )बीड बोरगाव आदी गावात जाऊन तांदूळ,तुरीची डाळ, गव्हाचे पीठ , तेल, तिखट, मीठ, हळद, मसाला इत्यादी रोजच्या उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे वाटप केले. संकट काळात मिळालेला हा मदतीचा हात गरजू कुटूंबांना मोठा आधार ठरला आहे.
यावेळी हिंगणा पं . स. सभापती बबनराव अव्हाळे, सरपंच प्रेमलाल भलावी, उपसरपंच दीपावली कोहाड,प्रकाश सोनकुसळे,महेश बंग, सिराज शेटे, जावेद महाजन, रफिक महाजन, मुकेश कथलकर, नंदू इटनकर, सुहास कोहाड, वच्छला मेश्राम, सुनीता नागपुरे, किन्ही येथे पंचायत समिती सदस्य सुनील बोदाडे भारत भोपे, सरपंच बेबीताई तीलपले, उपसरपंच विनोद उमरेडकर, ग्रामसेवक किशोर डाखोळे, खैरी (पन्नासे) येथील सरपंच उषा उमेश पन्नासे, सुधाकर खोडे, प्रवीण पन्नासे, प्रमोद पन्नासे, मनोहर राऊत, उमेश पन्नासे, शोभा मोरे, ललिता लाड, दर्शना पन्नासे, ग्रामसेवक अल्का मोटघरे, सावंगी येथे जि.प. सभापती उज्वला बोढारे, पं.स.सदस्य अनुसया सोनवणे, सरपंच प्रगती गोतमारे, राजू गोतमारे, पुरुषोत्तम गोतमारे, अनिल सिरसागर, आमगाव येथे कवडू भोयर, पिंटू भुयार, सुनील गोमासे, दिनेश फोफरे, सुकली येथे एकनाथ वऱ्हाडकर, राजकुमार निब्रड, देवळी येथील प्रभाकर लेकुरवाळे, प्यारू पठाण, पिंटू माथनकर, नामदेव परसे बोरगाव येथील सूर्यभान कोवे
गिरोला येथे गोविंदा काकडे, विठ्ठल काकडे, चंद्रभान काकडे, अरुण माने, ज्ञानेश्वर घोडमारे, शेषराव काकडे, शेषराव महाजन, माणिक थोटे, विठ्ठल डाफ, मेटाउमरी येथे अल्केश टिपले, दत्तू बोरकर मंगरूळ येथे सरपंच कविता सोमकुंवर,उपसरपंच ईश्वर काळे,सारिका मेश्राम, सविता उईके, सतीश पवार, विष्णू रोडे, नीलडोह पन्नासे येथे देवराव राऊत, सुनील गोरे, नथ्यू शास्त्रकार, वसंता लांबट, रुमाराव राऊत, मांगली येथे अरविंद भोले, उमेश निघोट विष्णू भोले, जुनेवानी येथील कोठीराम ठाकरे, अरुण येवले, विजय उमाळे, राजू उमाळे, मोतीराम ठाकरे, रामभाऊ उमाळे,संतोष ठाकरे, ज्ञानेश्वर मस्के, उखळी येथे चिंधु मसराम, दौलत खंडाते, बळवंत बाविस्कर, गणेश बाविस्कर, रामदास डडमल आदी उपस्थित होते.