मुंबई/ प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात किंबहूना जगावर मोठे संकट ओढावले आहे. या संकटाला घरीच राहून आपल्याला पराभूत करता येणार आहे. घरीच रहा, सुरक्षित रहा या धोरणाचे पालन करत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज पत्रकार मित्रांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
कोरोनाविरोधातील लढाईत @NCPspeaks पार्टी राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, फादर बॉडी, विविध सेल सर्वच जण सामान्यांच्या मदतीला धावून जाताना दिसत आहेत. कोरोनाचा हे संकट लवकर टळो हेच प्रयत्न आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री @CMOMaharashtra उद्धवजी ठाकरे यांना @NCPspeaks च्या कोट्यातून विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने दिला आहे. मा. राज्यपाल लवकरच याबाबत निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. कायद्याच्या चौकटीबाहेर जावून कोणीही काम करणार नाही याची मला खात्री आहे, जयंत पाटील म्हणाले.
कोरोनाचं एवढं मोठं संकट असताना मध्यप्रदेशात भाजपने काँग्रेसचे सरकार पाडले. संकटाच्या काळातही भाजपच्या मंडळींना सरकार पाडण्याचं सुचतं ही दुर्दैवी बाब आहे. जनतेचे काय होईल याचे घेणे देणे नाही. भाजप फक्त राजकारणाला प्राधान्य देतं हे यातून स्पष्ट होतं, अशी टीका त्यांनी केली.
मागे बातम्यांमध्ये वाचले की कोरोनासाठी येणारी मदत जर पंतप्रधान केअरला दिली तरच सीएसआर फंड म्हणून गणली जाईल राज्य सरकारला दिली तर नाही. हे कोत्या प्रवृत्तीचे लक्षण आहे. भाजप राजकारण करण्यात मश्गुल आहे हे देशातील जनतेला कळून चुकले आहे, असेही ते म्हणाले.