महसूल विभागातील तलाठी सुनिल रामटेके यांची गायनातून जनजागृती...
राजुरा/आनंद चलाख
राजुरा महसूल विभागातील तलाठी सुनील रामटेके आपल्या मधुर आवाजातून कोरोना जनजागृतीसाठी धडपडत आहे. तालुक्यात गोवरी साजाअंतर्गत कार्यरत सुनील रामटेके हे उत्कृष्ट गायक आहेत.कोरोणा विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या कर्तव्यासोबत नागरिकांना जागृत करण्यासाठी आपल्या कलेचा वापर करीत आहेत. सोशल मीडियातून त्यांचे कोरोनावरील 'अपने देश को बचाना हैं, कोरोना को हराना हैं.' या गीताला चांगली पसंती मिळत आहे.
सुनील रामटेके यांना बालपणापासूनच गायनाची आवड आहे. आपले कर्तव्य निभावत गायनाचे छंद जोपासतात. घरी मिळालेल्या फावल्या वेळेत नेहमी रियाज करतात. कराओके वर नेहमी चित्रपटातील व वेगवेगळे जुन्या हिट गाण्यावर आपला स्वरसाज चढवितात. चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक कुमार सानू त्यांच्या गाण्यांचा त्याच्यावर जास्त प्रभाव आहे. कुमार सानू चे हिंदी सुपरहिट गाणे कराओके व सराव करताना जास्तीत जास्त त्यांना आनंद मिळतो. असे ते सांगतात.
सद्यस्थितीत देश लाक डाऊन आहे. संचार बंदी सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमा राज्याच्या सीमा सील करण्यात आलेले आहे. घरीच रहा आणि सुरक्षित राहा. असा संदेश वारंवार प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. मात्र अजूनही काही प्रमाणात लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतात
अशावेळी खूप वेदना होतात. या लोकांना समजविण्यासाठी प्रशासन वारंवार प्रयत्न करीत नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून आहे. कायद्यांचे पालन न करणाऱ्या युवकांना संगीताच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी गोवरी साजाचे तलाठी सुनील रामटेके धडपड करीत आहेत.समाज माध्यमातून ते लोकांपर्यंत संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपात्कालीन स्थितीत आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असताना लोकजागृतीसाठी सुरु असलेली धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे.