Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २०, २०२०

घरगुती विज ग्राहक व शेतक-यांचे सरसगट विजबील माफ करा : नदीम ईनामदार

उर्जामंत्र्याकडे केली मागणी - उद्योगधंदे बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ





परभणी : प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोना या विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन कऱण्यात आले आहे त्यातल्या त्यात परभणीत मागील तीन दिवसापासून संचारबंदी लावण्यात आली होती.याकाळात लहान उद्योग, दुकाने, गॅरेज, बांधकाम व व्यवसाय मागील २५ दिवसापासून बंद असल्यामुळे या ठिकाणी काम करणारे कारागीर,मजुर, मिस्त्री, खाजगी नौकर किंवा लहान मोठे व्यवसाय करून आपल्या परिवाराची उपजिवीका भागविणाºयांचे हाल होत आहे. या काळात सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे १००युनिटच्या आत घरगुती वीज ग्राहक व शेतक-यांचे विजबील सरसगट माफ करण्याची मागणी कॉग्रेसचे शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी केली. कॉग्रेसच्या पक्षाच्यावतीने अनेकांना मदत करण्याचे कार्य सुरु असून अन्नधान्य वाटपही करण्यात येत आहे.जिल्हयात आजतागायत २ लाख वीजग्राहक आहेत. त्यापैकी १५९००० हे घरगुती तर ३० हजार कमर्शीयल, ३ हजार आयपी, ग्राहक व मोठे एस.टी. १५० असे मिळून २ लाख ग्राहक आहेत. अशा ग्राहकांना १०० युनिटच्या आत वीजबील माफ करण्याची मागणी जिल्हाधिकाºयामार्फत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार, नगरसेवक मोईन मौली, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख आदींच्या स्वाक्षºया आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.