Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

परभणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
परभणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, मार्च २५, २०२१

 नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांची निवड

नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या परभणी शहर अध्यक्षपदी मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांची निवड


परभणी - येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रा मध्ये सदा अग्रेसर असलेले तरुण तडफदार युवा नेते,सा. जन आक्रोश संपादक मयूर चंद्रकांतराव देशमुख याची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत्रकारचे संघटन असलेल्या नवी दिल्लीच्या इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या परभणी महानगर अध्यक्षपदी निवड आली

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कुमार कोठेजा , महाराष्ट्र वुमेन्स विंगच्या राज्य संघटक सचिव श्रीदेवी पाटील , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे मराठवाडा कार्याध्यक्ष धाराजी भुसारे , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन  परभणी जिल्हा अध्यक्ष मदनजी कोल्हे , इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन  हिंगोली जिल्हा अध्यक्ष उत्तम धारजे या मान्यवरच्या हस्ते या बाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र देण्यात आले.
परभणी येथील राजकीय , सामाजिक क्षेत्रात तरुण , तडफदार आणि धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे मयूर चंद्रकांतराव मोरे (देशमुख) यांचे नाव घेतले जाते .  
मयूर मोरे यांनी पत्रकारितेची सुरुवात साप्ताहिक जन आक्रोश मधून 2017 पासून सुरु केली असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या जन आक्रोश या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत . आपल्या पेपर च्या माध्यमातून समाजात पर्यावरण संरक्षण महत्व वाढावे व नवोदित साहित्यिकांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले .
विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने आंदोलने करून मोर्चे काढून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे, अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. (NSUI) नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (विद्यार्थी काँग्रेस) या संघटनेच्या ते महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. या पदाला पूर्णपणे न्याय देताना मयूर मोरे यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. जिल्ह्यातील अनेक तरुणा मधील सामाजिक भान हेरून त्यांनी या तरुणाना पुढे आणत एकत्र केलं आहे. त्यांचे सहकार्य घेत त्यांनी जिल्ह्यातील गावागावात संघटनेची पाळेमुळे रोवली आहेत. आणि याच माध्यमातून त्यांनी तळागाळातील विध्यार्थीच्या प्रश्न समजून घेऊन त्यांना वाचा फोडण्याचे, तसेच ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मयूर मोरे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. 
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यते प्राप्त काम करणारी, संपूर्ण भारतातील तसेच काही दिवसांपूर्वी जागतिक पातळीवर पोचलेली सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असो. या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या परभणी शहर अध्यक्षपदी श्री. मयूर मोरे (देशमुख) यांची अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे .
यावेळी देवानंद वाकले , अब्दुल रहीम , महमूद खान , विजय चट्टे रामेश्वर शिंदे , प्रवीण मोरे , आदी पत्रकार उपस्थिती होते. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची परभणी शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अभय देशमुख , सचिन जवंजाळ , राजपाल शिंदे तसेच सर्व क्षेत्रातून अभिनंदन वर्षाव होत आहे

बुधवार, एप्रिल २९, २०२०

पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर

पाच वर्षाचा बालक पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 14 वर

मुलाच्या आई-वडिलांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह
सदर कुटुंब औरंगाबादहून गावात आले होते




हिंगोली/ प्रतिनिधी - सेनगाव तालुक्यातील क्वारंटाइन सेंटर मधील 5 वर्षाचा बालक पॉझिटिव आला असून त्याबाबतचा अहवाल मंगळवारी (27 एप्रिल) सकाळी शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

जिल्हाभरात मोठ्या शहरातून येणाऱ्या गावकऱ्यांची गावपातळीवर माहिती घेऊन त्यांना तातडीने क्वारंटाइन केले जात आहेत. त्यानुसार सेनगाव तालुक्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या 61 गावकऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी 51 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दहा जणांचा अहवाल येणे बाकी होते. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल प्राप्त झाला असून यामध्ये पाच वर्षांचा बालक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात पॉझिटिव रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे.


दरम्यान सदर मुलाचे आई-वडील औरंगाबाद येथे कामासाठी गेले होते. लॉकडाउननंतर ते सर्वजण सेनगाव तालुक्यातील जांभरून रोडगे गावात आले. सदर कुटुंब औरंगाबाद येथून आल्याची नोंद झाल्यानंतर त्यांना तातडीने सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुणवाल यांच्या पथकाने या गावकऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. या गावकऱ्यांपैकी 51 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज सकाळी एका पाच वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यानंतर आरोग्य विभागामध्ये धावपळ सुरु झाली.

गाव सील करण्याची प्रक्रिया सुरू
यासंदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांनी तातडीने सर्व माहिती घेऊन जांभरून रोडगे गावांमध्ये तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय गाव सील करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील दोन दिवस जांभरून रोडगे या गावामध्ये सर्वेक्षणाचे काम केले जाणार असून सर्दी ताप खोकला असलेल्या रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे. यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सतीश रुणवाल यांनी सांगितले की सदरील बालक जाभरून रोडगे येथील असून त्याचे कुटुंबीय 20 एप्रिल रोजी गावात आले होते. त्यानंतर तातडीने त्यांना सेनगावच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या आई-वडिलांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.


गावकर्‍यांनी घाबरून जाऊ नये : रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी

सेनगाव तालुक्यातील पाच वर्षांचा बालक आल्यानंतर त्या गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतले जात आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गावकऱ्यांनी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य माहिती द्यावी. तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

गुरुवार, एप्रिल २३, २०२०

कलेक्टर व तहसीलदार येण्याची अफवा करून गर्दी जमवली

कलेक्टर व तहसीलदार येण्याची अफवा करून गर्दी जमवली



१२५ जणांसह पत्रकारांवर गुन्हा दाखल


परभणी /प्रतिनिधी
पालम : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस निरीक्षक सुनील माने आणि त्यांच्या टीमने गावातील 125 व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात बोलताना पोलिस निरीक्षक सुनील माने म्हणाले. की पारवा गावात विविध अडचणी सोडविण्यासाठी गावातील काही मंडळींनी लाऊड स्पीकर द्वारे गावातील लोक जमा केले. वास्तविक कलेक्टरांचे जमावबंदी आदेश आहेत. सध्या या कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी गर्दी जमा होऊ नये असेही आदेश आहेत.परंतु पारवा गावातील लोकांनी याचे उल्लंघन केले. तसेच तहसीलदार आणि कलेक्टर येणार आहेत अशा अफवा पसरविल्या. त्याच प्रमाणे काही मिडीयाला देखील मुलाखती दिल्या. त्यामुळे पत्रकारावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली. या गावातल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तहसीलदार आणि परभणीचे कलेक्टर येणार आहेत. अशा आशयाच्या अफवा उठवीत गावातील लाऊड स्पीकर द्वारे घोषणा करून जमावबंदी असताना गर्दी करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून गावातील 125 जणांसह पत्रकारांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना घडलीय. पालम तहसील कार्यालयाचे मंडळ निरीक्षक कालिदास शिंदे यांनी यासंदर्भात पालम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे या तक्रारी नुसार गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलिस निरक्षक सुनिल माने याच्या मार्गदर्शनाखाली फोजदार सचिन ईगेवाड तपास करत आहेत.

मंगळवार, एप्रिल २१, २०२०

२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे दिले आदेश

२३ तारखेपासून जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू; हरभरा खरेदीसाठी दोन दिवसात ग्रेडर नेमण्याचे दिले आदेश

आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य - पालकमंत्री धनंजय मुंडे


जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक




परभणी : प्रतिनिधी( बिड) :-
दि. २१ कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात वाढत असला तरी बीड जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे, येथून पुढे देखील सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोना पासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

यावेळी राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे, त्यानुसार सोशल डिस्टन्सिंग सह खबरदारी पाळत कापूस खरेदी केंद्रांवर येत्या २३ तारखेपासून कापूस खरेदी सुरू करण्याचे आदेश ना. मुंडेंनी दिले. तसेच हरभरा खरेदी सुरू करण्यासाठी दोन दिवसाच्या आत ग्रेडर नेमण्याचे आदेशही ना. मुंडेंनी संबंधितांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील हे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, करोणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत चांगले काम झाले आहे परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, या प्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नये यासाठी देखील खबरदारी घेतली जावी असे ते म्हणाले. तसेच यासाठी पोलीस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना श्री. मुंडेंनी पोलीस अधीक्षकांना केल्या.

  मंत्री महोदयांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करताना कोणताही भेदभाव अथवा तक्रारी होऊ नये यासाठी लक्ष दिले जावे . अंबाजोगाई येथे कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी लवकरच तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात सुरु होणाऱ्या केंद्रात काम वेगात केले जावे. 

           शेतकऱ्यांच्या बाबत देखील संवेदनशील राहून उपाययोजना केल्या जाव्यात , फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयीस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जावे, शासनाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जावी असेही यावेळी त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री . रेखावार म्हणाले की, रेशन कार्डधारकांसाठी मंजूर धान्य नियतन सर्व स्वस्त धान्य दुकानात पर्यंत पोहोचविण्यात आले आहे याच बरोबर साखर चे नियतन देखील जिल्ह्यात प्राप्त झाले असून एप्रिल ते जूनपर्यंते पात्र लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे. कोरोना विषाणूची नमुने तपासण्यासाठी अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात स्वतंत्र इमारत तयार होत असून त्यासाठी यंत्र व साहित्य सामग्री देखील लवकरच प्राप्त होत आहे.

 पोलीस अधीक्षक श्री पोद्दार यांनी आज दुपारपर्यंत जिल्ह्यात 6740 ऊसतोड कामगार आले असल्याचे आकडेवारी यावेळी सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभार, डॉ. थोरात डॉ. पवार व श्री. आघाव पाटील आदींनी यावेळी माहिती सादर केली.

सोमवार, एप्रिल २०, २०२०

घरगुती विज ग्राहक व शेतक-यांचे सरसगट विजबील माफ करा : नदीम ईनामदार

घरगुती विज ग्राहक व शेतक-यांचे सरसगट विजबील माफ करा : नदीम ईनामदार

उर्जामंत्र्याकडे केली मागणी - उद्योगधंदे बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ





परभणी : प्रतिनिधी
देशात व राज्यात कोरोना या विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन कऱण्यात आले आहे त्यातल्या त्यात परभणीत मागील तीन दिवसापासून संचारबंदी लावण्यात आली होती.याकाळात लहान उद्योग, दुकाने, गॅरेज, बांधकाम व व्यवसाय मागील २५ दिवसापासून बंद असल्यामुळे या ठिकाणी काम करणारे कारागीर,मजुर, मिस्त्री, खाजगी नौकर किंवा लहान मोठे व्यवसाय करून आपल्या परिवाराची उपजिवीका भागविणाºयांचे हाल होत आहे. या काळात सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे १००युनिटच्या आत घरगुती वीज ग्राहक व शेतक-यांचे विजबील सरसगट माफ करण्याची मागणी कॉग्रेसचे शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी केली. कॉग्रेसच्या पक्षाच्यावतीने अनेकांना मदत करण्याचे कार्य सुरु असून अन्नधान्य वाटपही करण्यात येत आहे.जिल्हयात आजतागायत २ लाख वीजग्राहक आहेत. त्यापैकी १५९००० हे घरगुती तर ३० हजार कमर्शीयल, ३ हजार आयपी, ग्राहक व मोठे एस.टी. १५० असे मिळून २ लाख ग्राहक आहेत. अशा ग्राहकांना १०० युनिटच्या आत वीजबील माफ करण्याची मागणी जिल्हाधिकाºयामार्फत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नदीम ईनामदार, नगरसेवक मोईन मौली, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख आदींच्या स्वाक्षºया आहेत.