• कामगारांची नियमित आरोग्य तपासणी, काउंसेलिंग सेशन सुरु
• मेट्रो कामगाराने केले समाधान व्यक्त
नागपूर ०७ कोरोना वायरसचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्याकरिता महा मेट्रोद्वारे सुरुवातीपासूनच खबरदारी घेतल्या जात आहे. यांच अनुषंगाने महा मेट्रोद्वारे कामगार कॉलनी मध्ये औषध फवारणी तसेच कामगारांची नियमितपने आरोग्य तपासणी केल्या जात आहे. वायरस प्रादुर्भाव रोखण्याकरिता आवश्यक सर्व खबरदारी महा मेट्रोद्वारे घेण्यात येत आहे.
महा मेट्रो द्वारे शहरातील विविध भागामधील ४० कामगार कॉलोनी मध्ये ३००० कामगारांकरिता या प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. औषध फवारणी आणि नियमित आरोग्य तपासणी व्यतिरिक्त कोविड-१९ व कुठल्याही आजाराची खबरदारी म्हणून तपासणी केल्या जात आहे. मेट्रो निर्माण कार्यात कार्यरत झारखंड राज्यातील कामगार श्री. कुलदीप सिंह ने कामगार कॉलोनी मध्ये उपलब्ध असलेल्या सोई सुविधा पासून प्रसन्नता व्यक्त केली.
८ डॉक्टर आणि ११ नर्स विविध कामगार कॉलोनीमधील कामगाराची काळजी घेत असून कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीकरिता रुग्णवाहिका याठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. २० सुरक्षा रक्षाकाची चमू आपत्कालीन परिस्थिती करिता सदैव कार्यरत आहे.
मुख्य म्हणजे या सर्व कामगार कॉलोनीमध्ये आयसोलेशन चेंबरची निर्मित करण्यात आली आहे. या ठिकाणी कार्यरत श्री. मोहम्मद सबीर या कामगारने सांगितले कि, कॉलोनी मध्ये नियमितपणे साफसफाई करण्यात येते असून कामगांराचे थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी केल्या जाते.
उत्तर प्रदेश राज्यातील श्री. समशेर सिंह या कामगाराने सांगितले कि, कोविड-१९ मुळे उदभवलेल्या समस्येमुळे सोशल डीस्टसिंग पाळत असल्याचे सांगितले. कामगारांनमध्ये जागरुकता आणन्याकरिता प्रशिक्षण सत्र आणि पोस्टरच्या माध्यमाने जागरुकता अभियान राबविल्या जात आहे. आतापर्यत सुमारे १३० जागरूकता अभियान राबविले असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व कामगारांना सुरक्षा उपकरण ज्यामध्ये मास्क, हातमोजे इत्यादीचे वाटप करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त १२ थर्मल स्कॅनर (इंफ्रारेड थर्मामीटर) शरीराचे तापमान मोजण्याकरिता उपलब्ध आहे.वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नियमितपणे या कॉलोनीची पाहणी करून आवश्यक काळजी घेत आहे. महा मेट्रोद्वारे कोविड-१९ च्या बचावापासून कामागांराकरिता आवश्यक सर्व उपाय योजना करण्यात येत असून कामगार कॉलोनीची आवश्यक काळजी घेण्यात येत आहे.