एक आठवड्यानंतर पेटणार आमच्या चुली
ओघळले आनंदाअश्रू
नागपूर : अरूण कराळे:
संपूर्ण देशातील संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच काम धंदे बंद असल्याने दररोजची हातमजुरी करून हातावर आणून पोटभरनारा सर्वसामान्य कष्टकरी वर्ग या लॉक डाऊन मध्ये भरडला जात असून कित्येक दिवसापासून रोजगार बंद असल्यामुळे मजुरीही मिळाली नाही.
अशा अनेक परिवाराच्या मागील एक आठवड्यापासून चुलीच पेटल्या नाही याची माहिती तालुक्यातील वाडी येथील ज्ञान विद्या मंदिर शाळेचे संचालक अधरचंद्र पांडे,जटाशंकर पांडे यांनी पुढाकार घेत श्रीराम नवमीच्या शुभ पर्वावर पूजा-पाठ यावर वेळ न घालविता गरजुवंताना तांदूळ-डाळीचे वाटप करून मजुर वर्गावर येणारे उपासमारीचे संकट दूर केले.
वाडी शहर व त्याच्या लगतच्या परिसरात कामाचे शोधात दुसऱ्या राज्यातून व वेवेगळ्या जिल्ह्यातील भागातून मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय कामगार वर्ग येऊन मिळेल ते रोजमजुरीचे काम करणारी अनेक कुटुंबे येऊन येथे स्थायिक झाली आहेत.परंतु देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशात लॉक डाऊन होऊन काम-धंदे बंद होईल याची पुसट कल्पनाही मेहनतीचे काम करणाऱ्या कामगारांना नसल्यामुळे घरातील जमा असलेले मोजके धान्य दोन दिवसातच संपले.काम बंद असल्याने घरातील कमावता पुरुष-स्त्री घरीच असल्याने मजुरीही मिळणे बंद झाल्याने अशा मजूर वर्गाच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली.
वाडी-लाव्हा-खडगांव रोड खदान परिसरात मागील दोन ते तीन वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील अनेक परिवार स्थायिक झाले असून दगड-धोंडे फोडण्याचे कठीण मेहनतीचे काम करून आपल्या परिवाराचे पालन-पोषण करीत आहे.परंतु काम बंद असल्याने घरातील सर्व अन्न-धान्य संपल्याने परिवारातील लहान मूल उपाशीपोटी केविलवाणीपणे कुणीतरी आपल्याला मदत करील काय?या आशेच्या किरणांनी आतुर होऊन वाट पाहतात.या परिवाराची माहिती संचालक पांडे बंधूंना मिळताच त्यांचे मदतीचे हात पुढे सरसावली.
संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत मिळताच आमच्या चुली आज पेटणार आज आम्ही पोटभर जेवणार अशी कृतज्ञनता व्यक्त करीत त्याच्या डोळ्यात आनंदाअश्रू झळकली.शहरातील गर्भ श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांच्या शाळा,कॉलेज कार्यरत असून परिसरातील पालकांच्या आर्थिक स्थितीची जाणीव शाळा संचालक,मुख्याध्यापक यांना माहिती असते.त्यामुळे त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत अशाच प्रकारे सहकार्य करण्यासाठी पुढे येणे ही आजची गरज आहे.