
ऑनलाईन ३ लाख १० हजार काढले
सायबर व वाडी पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर : अरूण कराळे:
दिवसेंदिवस देशात सायबर क्राइम वाढत असून वेगवेगळ्या कारणामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय फसवणूकीला बळी पडत असल्याचे प्रकार घडत आहे.असाच प्रकार तालुक्यातील वाडी येथील सुशिक्षित युवती सोबत घडून तिच्या खात्यातून एकाच दिवशी ३ लाख १० हजार काढुन एका युवतीसोबत नोकरीच्या नावाखाली फसवणूकीचे प्रकरण समोर आले असून फसवणूकीचा गुन्हा पोलिसात दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार कंट्रोल वाडी येथील रहिवासी कु. पल्लवी संजय थूल वय २७ ही एका खासगी कंपनीत नोकरी करीत असून तिला एके दिवशी दिल्ली येथून आरोपी कबीर चंद्रा उर्फ रमण राणा नावाच्या व्यक्तीने शुक्रवार ३ एप्रिल २०२० रोजी पल्लवी हिला फोन करून आम्ही www.monterjobs. com येथून बोलत असून आपला रिझुम मिळाला असून आपण नौकरी करण्यास तयार असल्यास केवळ १० रुपयाचे इंटरनेटच्या माध्यमातून ऑन लाईन ट्रांझेक्शन करण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे आरोपीना मुलीच्या खात्यातील डिटेल मिळाल्या काही वेळातच पल्लवीच्या 34337960251या अकाउंट नंबरवरून इंटरनेटच्या माध्यमातून आरोपींनी आयसीआयसीआय बँक कृष्णानगर दिल्ली खाते क्रमांक 102401507149 मध्ये जमा करून २ लाख रुपये , त्यानंतर ९० हजार रुपये आणि २० हजार असे एकूण ३ लाख १० हजार काढून आरोपीने खाते रिकामे केले.
पल्लवी एका खासगी कंपनीत नोकरी करीत असून तिचे वडील पेट्रोल पंपावर काम करीत आहेत. फसवणूकीने गरीब कुटुंबातून ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल फिर्यादी पल्लवी हिने वाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीच्या विरोधात कलम 419,420 सहकलम 66(क)(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.