Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १०, २०२०

वाडीत सोशल डिस्टन्सिंगचा आगळावेगळा प्रयोग

आ.समीर मेघे मित्र परिवाराचे कौतुक 
नागपूर : अरुण कराळे:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य झाले आहेत. अनेक ठिकाणी गरिबांना अन्न किंवा आवश्यक साहित्यांचे वाटप करीत असतांना गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु वाडी येथे आमदार समीर मेघे मित्र परिवारा तर्फे दररोज सकाळ ,संध्याकाळ गुरुद्वारा येथे सुरू असलेल्या लंगर सेवेत जेवण घेण्यासाठी येणाऱ्या गोर गरीब नागरिकांकडून चक्क डिफीनची रांग लावली जात आहे.

 घरी राहणाऱ्या कुटूंबासाठी जेवणाची सोय व्हावी यासाठी ते टिफिन घेऊन येतात दररोज शेकडो लोक येत असल्यामुळे सहाजिकच तेथे गर्दी होण्याची भीती आहे. परंतु कार्यकत्योनी त्यावर उपाय शोधला आहे येथे लोक रांगेत लागत नाही तर तिथे टिफीनची रांग लावली जाते . विशेष म्हणजे दोन टिफीन मध्ये एक ते दीड मीटरचे अंतर असते. 

अन्न वाटप सुरू झाल्यानंतर लोकांपैकी एक एक जण पुढे येऊन हळूहळू एक एक टिफीन पुढे सरकतो त्यामुळे गर्दी न होता शेकडो लोकांना जेवण मिळते विशेष म्हणजे लंगर सेवा चालवणा-या आ. समीर मेघे मित्र परिवाराला सोशल डिस्टन्सिंगचा देखील यामुळे त्रास होत नाही .

आगळावेगळा प्रयोग राबविण्यासाठी केशव बांदरे,नरेश चरडे ,राकेश मिश्रा ,दिनेश कोचे , देवराव कडू ,कमल कनोजे ,मनोज रागीट , सुजित नितनवरे ,प्रकाश डवरे ,चंद्रशेखर देशभ्रतार ,मनोज रागीट अक्षय तिडके ,पुरुषोत्तम लिचडे ,नितीन अन्नपूर्णे , देवेंद्र बोरीकर ,रामेश्वर बागडे ,विपीन खेडेकर ,मयंक रागीट , जनकताई भोले ,ज्योती भोरकर , कल्पना सगदेव ,सरीता यादव ,शालीनी रागीट ,आशा कडू आदी प्रयत्नरत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.