Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०५, २०२०

खबरबातचा प्रभाव:स्वस्त धान्य दुकानात सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळा

पोलीस विभागातर्फे नागरीकांचा बंदोबस्त 
नागपूर: अरूण कराळे:
संचारबंदी आणि लॉक-डाऊनमुळे गरीब सर्वसामान्य नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये म्हणून राज्यशासनाने प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना त्यांचा प्रत्येक महिन्यात मिळणारे नियमित राशन वाटप सुरू केले आहे .

वाडीतील  काही स्वस्त धान्य दुकानात नागरीकही गर्दी करीत असुन सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत नसल्यामुळे संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले .अशा पद्धतीची बातमी खबरबातमध्ये शनिवार ४ एप्रिल रोजी प्रकाशीत होताच वाडी पोलीस स्टेशन तर्फे वाडीतील प्रत्येक वार्डात पोलीस विभाग फिरत आहे . 

दुकानात होत असलेली गर्दी कमी करुन सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले. सरकारी स्वस्त धान्य दुकान असो की भाजीपाला किंवा किराणा दुकाना मध्ये नागरीक गर्दी करीत आहेत . हीच गर्दी कोरोना विषाणूचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे .त्यामुळे नागरीकांनी संचारबंदीचे नियम पाळावे .घरी राहा ,सुरक्षीत राहा , अतिआवश्यक कामासाठीच बाहेर पडा असे आवाहन वाडी पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांनी केले आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.