Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०१, २०२०

तात्काळ धान्य पूरवठा करुन मोफत वितरीत करा:आमदार किशोर जोरगेवार

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
  संचारबंदीमूळे संपूर्ण देश बंद पडला आहे. चंद्रपूरातही कडकडीत लाॅकडान पाळल्या जात आहे. मात्र आता या लाॅकडानमू-ळे हातावर आणून पाणावर खाणा-या कष्टकरी मजुरांचे मोठे हाल होत आहे. त्यामूळे सरकारकडून पाठवण्यात येणा-या धान्याचा तात्काळ पूरवठा करुन हे धान्य मोफत वितरीत करा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. याबाबत आज आ. जोरगेवार यांनी राज्याचे उपमूख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनी वरुन चर्चाही केली आहे.

  कोरोनाशी लढण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. संचारबंदीचे पालन करत असतांना नागरिकांना अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. मात्र देशसेवेसाठी नागरिक प्रशासनाला कौतूकास्पद सहकार्य करतांना दिसून येत आहे. ही लढाई जिंकण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत गरजेचा असून नागरिकांकडून पूढेही प्रशासनाला असेच सहकार्य लाभनार असल्याची आशा आ. किशोर जोरगेवार यांनी वर्तवली आहे. सध्या आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने गरिबगरजुंना अन्न वाटप केल्या जात आहे.
 असे असले तरी शेवटच्या गरजुंपर्यत पोहचण्यात अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. दरम्याण शासनाच्या वतीने दिलासा देणारी बातमी आली असून शासनाच्या वतीने रान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अदयापतरी सरकारी स्वस्त धान्य दुकानामध्ये धान्य आलेले नाही. त्यामूळे नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. हि चिंतेची बाब आहे. याची दखल तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी केली आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणारे धान्य तात्काळ रान दुकानात पोहचविण्यात यावे व हे धान्य मागेला त्याला मोफत वितरीत करण्यात यावे अशी मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. 

तसेच आज आ. किशोर जोरगेवार यांनी राज्याचे उपमूख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत चंद्रपूरच्या परिस्थीतीशी त्यांना अवगत केले आहे. त्यामूळे लवकर आता धान्य पूरवठा होन तो वितरीत केला जाणार अशी आशा व्यक्त होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.