चंद्रपुर/प्रतिनिधी:
कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आता सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीही याला हातभार लावत आहेत.
अशातच IMA चंद्रपूर संस्थेकडून महानगरपालिकेला कोरोणा विषाणु प्रादुर्भावाच्या उपाययोजनांकरीता ६० हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव थांबावा याकरीता घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांकरीता समाजातील विविध स्तरांमधून आर्थीक, सहकार्य होत आहे.
महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला . यावेळी IMA चे अध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. अनिल माडुरवार, खजिनदार डॉ. नरेंद्र कोलते, आदी उपस्थित होते.यावेळी IMA तर्फे कळविण्यात आले की, शहरातील सर्व दवाखाने सुरु राहतील. आपात्कालीन उपचाराकरीता 18 व्हेंटीलेटर IMA तर्फे सुरु राहतील. डॉक्टरांतर्फे कोरोणा विषाणु बाबत जाणीव-जागृती सुरु राहील.
याकरीता राहुल पावडे यांनी IMAचे अभिनंदन केले असुन समाजातील दानशुर संस्था व नागरीकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.