चंद्रपूर
यवतमाळ जिल्ह्यातील विहीर बांधकाम करणारे मजूर राजुरा तालुक्यातील तेलंगणा सीमेवर विहीर खोदण्याचे काम करित होते. देशात लाॕक डाऊन लागु झाल्याने ते अडकून आहेत.राहण्याची व्यवस्था उपाशीपोटी मजूर कसेबसे दिवसं काढंत आहेत. कोरोनाचे संकट त्यात वादळी पाऊस बरसला. पावसात भिजल्याने मजूर कुडकुळत होते. अश्यात जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्षांचा नजरेत मजूर आले. माणूस जागा झाला. त्या मजूरांना आसरा देण्यासाठी माणूस धावून गेला.
पोट भरण्यासाठी तेलंगणात गेलेल्या मजूरांवर आभाळ कोसळले आहे. देशात लाॕक डाऊन असल्याने तेलंगणा राज्यातील विविध भागात मजूर अडकून पडले आहे. राहायला जागा नाही,खायला अन्न नाही अश्या स्थितीत मदत करा अशी आर्त हाक मजूर देत आहेत. काही पर्यंत मदत पोहचली मात्र अद्यापही अनेक मजूरांचे बेहाल आहेत. या मजूरांना आधार देण्यासाठी सामाजिक दायीत्व जोपासणारे पुढे येत असल्याने अनेकांना मोठाच आधार मिळत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील जाम बाजार येथिल मजूर राजूरा तालूक्यात विहीर खोदकामाचा कामासाठी आलेले आहेत. संचारबंदी असल्याने ते अडकून आहेत. राहायला छत नाही.खायला अन्न नाही अश्या स्थितीत ते दिवस काढीत होते.त्यांचा संकटात पुन्हा भर पडली. वादळी पावसाने कोरपना तालूक्याला झोडपून काढले. पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी झाडा आसरा घेतला होता. पावसात भिजल्याने थंडीने कुडकुडणार्या या मजूरावर जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबीद अली यांची नजर गेली. त्यांनी मजूरांची विचारपूस केली. ठाणेदार अरुण गुरनुले यांना माहीती दिली. या सर्वांची जेवनाची व्यवस्था करण्यात आली. या मजूरांना गावाला जाण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात आले.