चंद्रपूर
कोरोनाचा भितीचा सावटात गावे हादरली आहेत.घराचा बाहेर जाणे गावकर्यांनी टाळले. अश्यात उभी असलेली पिके बघण्यासाठी बळीराजाचे शेतात ये जा सूरु आहे. मात्र शेतात वाघोबाचे पगमार्ग आढळून आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. गावात कोरानाची तर शेतात वाघोबाची भिती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर देश टाळेबंद झाला. गावखेड्यातही कोरोनाची भिती दिसून येत आहे. आता या भितीत वाघोबाने भर घातली आहे.गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या हीवरा गावालगत वाघ दिसून येत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावापासून जवळच असलेल्या विलास कुत्तमारे यांचा शेतात वाघाचे पगमार्ग आढळून आले.किरमीरी मार्गावरही अनेक ठिकाणी पगमार्ग आहेत. शेतात ये जा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना वाघोबाने दर्शन दिले.कोरोनाचा सावटात गावकर्यांनी स्वताला कुलूप बंद केले. मात्र शेतात उभे असलेले पिकं बघायला बळीराजाचे शेतात ये जा सूरु आहे.अश्यात वाघोबाने शेतशिवारात आसरा घेतल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान गावकर्यांनी वनविभागाला पगमार्गाची माहीती दिली.वनरक्षक धनराज रायपुरे,गोविंदा गेडाम यांनी पकमार्गाची पाहणी केलि.