
नागपूर /अरूण कराळे:
तालुक्यातील वाडी येथील सामाजीक कार्यकर्ते चंदशेखर देशभ्रतार यांनी वाडी नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या गरजू नागरीकांना राशन मिळवून दयावे अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना गुरुवार १६ एप्रिल रोजी ई- मेल द्वारे दिले .
बऱ्याच लोकांचे राशन कार्ड बनलेले आहेत. राशन कार्ड बनवितांना तहसील कार्यालय नागपूर(ग्रामीण ) येथे प्रत्येक नागरीकांना सांगीतले की, फक्त आता एपीएल केशरी राशनकार्ड बनणार. बीपीएल, प्राधान्यचे कार्डची योजना सध्या बंद आहे. लोकांनी पुढे तरी राशन मिळेल या आशेने राशनकार्ड बनविले.
मान्यवर, आज टाळेबंदला एक महिना होत आहे. सर्वांचे कामधंदे बंद आहेत .लोक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे .लोकांच्या घरचे अन्नधान्य संपले आहे. आर्थिक अडचणीमुळे खुल्या बाजारातून धान्य खरेदी करण्यास अक्षम आहेत.राशन दुकानदार त्यांना राशनचे धान्य देण्यास नकार देत आहे.या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोक वैतागून गेले आहे.
तरी आपणास विनंती आहे आपण आपल्या स्तरावर कार्यवाही करून सर्व प्रकारच्या गरजू राशनकार्ड धारकला रियायती भावाचे राशनचे धान्य उपलब्ध करून घ्यावे. धान्य वाटपाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यास बाध्य करावे हीच विनंती . अशा प्रकारचे निवेदन दिले .