Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १६, २०२०

वाडीत या रुग्णालयात रुग्णावर सुरू आहे मोफत उपचार


नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन 
नागपूर:अरुण कराळे:
तालुक्यातील वाडीतील दत्तवाडी , गजानन सोसायटी मधील पल्लवी क्लिनीक व पल्लवी पंचकर्म यांच्या वतीने कोविड -१९ विषाणू या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पल्लवी क्लिनीक मध्ये मोफत उपचार पध्दत २४ मार्च ते २० एप्रिल रोजी दुपारी १२. ३० ते १. ३० व संध्याकाळी ७ ते ८ वाजता पर्यंत सुरू आहे . या उपचार पद्धतीचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. पल्लवी राणे यांनी केले आहे. 

आजपर्यंत ५०० रुग्णांनी लाभ घेतला आहे. नि:शुल्क पद्धती असल्यामुळे दवाखाना मध्ये रुग्णांची संख्या अधिक आहे तरीही सोशल डिस्टंसिंगचा नियम व्यवस्थीत पाळून प्रत्येक रुग्णांला मास्क वापरणे बंधनकारक ठेवत आहे या साठी पती सतीश राणे यांची मदत मोलाची ठरत आहे. डॉ. पल्लवी राणे या आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब नागपूर आयुर्वेदच्या सचिव ,निमा महाराष्ट्र महिला मंच शाखेच्या कोषाध्यक्ष ,निमा नागपूर महिला मंच शाखेच्या अध्यक्षा आहे . दरवर्षी मोफत उपचार पध्दत राबवित असुन गरीबांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे हे व्रत अंगीकारले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.