Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १२, २०२०

धक्कादायक:नागपुरात कोरोंना +VE ची संख्या 41 वर;रविवारी नवीन 14 रुग्ण वाढले


नागपुर/ललित लांजेवार:
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतांना नागपुरात देखील धक्कादायक माहिती समोर आली. रविवारी सकाळी एक नाही दोन नाही तर तब्बल चौदा रुग्ण कोरोंना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली. 

नागपुरात हे सर्व रुग्ण रविवारी सकाळच्या सुमारास समोर आले. सकाळी दोन आणि दुपारपर्यंत 12 झाला असे एकूण 14 रुग्ण आढळल्याने नागपुरात खळबळ उडाली. यातील काही लोक दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ होऊन आलेले असल्याच सांगण्यात येत आहे.

एकूण वाढलेल्या आकडामुळे नागपूरची एकूण कोरोंना पॉझिटिव्ह संख्या आता 41 वर पोहोचली आहे. या पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात कोण कोण आले याची चौकशी आता आरोग्य विभाग व पोलिस करू लागलेली आहे. त्यामुळे नागपूरकरांनी आता घरातच राहण्याचे योग्य असल्याचे आजच्या या आढळलेल्या कोरोंना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येवरून समजून येत आहे. 
पॉझिटिव्ह रुग्ण MLA हॉस्टेल येथे विलगीकरण प्रक्रियेत होते. 

रविवारी आढळलल्या १४ रुग्णांमध्ये चार जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने आपणा सर्वांना आता आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंबंधी माहिती देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, सर्व १४ ही रुग्णांना यापूर्वीच 'क्वारंटाईन' करण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर रविवारी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी पूर्वीच क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्यापासून इतरत्र कोरोना पसरण्याची भीती नाही. दिल्ली येथून प्राप्त माहितीच्या आधारे २५१ व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलले ३० अशा एकूण २८१ व्यक्तींना 'क्वारंटाईन' करण्यात आले होते. दिल्ली येथून आलेल्यांमध्ये ८ जण मूळचे जबलपूरचे आहेत. या आठ जणांपैकी चौघे कोरोनाग्रस्त असल्याने निष्पन्न झाले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर खबरदारीच्या दृष्टीने सील करण्यात येतो. त्यानुसार सदर रुग्ण राहत असलेला सतरंजीपुरा, मोमीनपुरा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. तर काही रुग्ण काटोल रोड व कामठी रोड भागातील असून तो परिसरही सील करण्यात येत आहे. संसर्ग पसरू नये यासाठी मनपातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने टीम निर्धारित केल्या असून १४ दिवस मनपाची चमू निर्धारित परिसर, तेथील घरे आणि लोकसंख्या या सर्वांची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सर्वेक्षण करणा-या चमूला व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
दक्ष राहा, लक्षणे आढळल्यास त्वरित मनपाला माहिती द्या
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती संख्या ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या ३० लाख लोकांचे आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे या ३० लाख लोकांनाच आता ठरवायचे आहे की कोरोनाशी लढा कसा द्यायचा. संक्रमण वाढत आहे, दक्ष राहा. अशा स्थितीत घराबाहेर न पडणे जास्त संयुक्तिक आहे. जीवनावश्यक वस्तू शक्यतो फोनवरूनच घरी मागवा. 

बाहेर जाण्याची गरज पडल्यास मास्क वापरा, सोशल डिस्टंनसिंगचे पालन करा. कुणाच्या संपर्कात आल्यास, ताप, सर्दी, कोरडा खोकला येत असेल तर त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्या. वेळेत उपचार झाल्यास कोरोनापासून लवकर बरे होता येईल. त्यामुळे सजग राहा, निमयांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

एकाच दिवशी कोरोनाचे एवढे बाधित रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. एकदाच एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनावर ताण पडला आहे. याबाबतची माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.