Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १२, २०२०

खेतापुर, ससेगाव येथे भटक्या गोपाळ समाजातील नागरिकांना अन्नधान्याचे वितरण

१९९कुटुंबांना उपविभागीय अधिकारी
 हिरामन झीरवाळ यांची मदत 
चांपा: 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र जिल्हाबंदी असल्याने या लॉकडाऊनच्या काळात शहरात व गावोगावी फिरणारे , भटके , विमुक्त गोपाळ समाजाची मोठी पंचाईत झाली .त्यांना आहे त्या ठिकाणी थांबणे आवश्यक असल्याने कुही तालुक्यातील खेतापूर व ससेगाव येथे असलेल्या दोनशेच्या जवळपास महिला पुरुषांची उपासमार सुरू होती .त्यांना उमरेडचे उपविभागीय अधिकारी हिरामन झिरवाळ यांनी आपल्या मुलीचा १४एप्रिलला असणारा जन्मदिवस कार्यक्रम रद्द करून या कार्यक्रमात होणाऱ्या खर्चातून खेतापूर , ससेगाव येथील १९९ भटक्या गोपाळ समाजाच्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप केले .

कुही तहसील कार्यालयकडून गोपाळ समाजाला राशनकार्ड धारकांना व विना राशनकार्ड गरजू धारकांना अन्नधान्य व आवश्यक किराणाचे वाटप करण्यात आले .त्यामुळे गोपाळ समाजातील नागरिकांनी उमरेड उपविभागीय अधिकारी हिरामन झिरवाळ व महसूल विभागाचे आभार मानले आहे .

नागपूर , कुही तालुक्यातील खेतापूर, ससेगाव येथील भटक्या गोपाळ समाजाचे दीडशे पेक्षा जास्त कुटुंबे गेल्या पन्नास वर्षापासून खेतापूर, ससेगाव येथे फाटलेल्या चिंध्याच्या साडीच्या पाल टाकून झोपडया तयार करून राहू लागले .गावोगावी खेळ दाखवून आपले व कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत होते .

राज्य व देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने सर्वत्र नागपूर जिल्ह्यात लॉकडाऊन केले .त्यामुळे गावात व इतरत्र फिरून आपला व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे .त्याठिकाणी थांबायचे असल्याने जवळचे अन्नधान्य होते तोपर्यंत जगले .पण पैसा अन्नधान्य संपल्याने त्यांची उपासमार सुरू झाली. 

गावात त्यांना कोणी मदत करीत नव्हता , हि गोष्ट महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास येताच भटक्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे , मुलीच्या जन्मदिनावर होणारा खर्च टाळून उपविभागीय अधिकारी झिरवाळ यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला .वाटप करतेवेळी कुहीचे तहसीलदार बाबाराव तीनघसे , नायब तहसीलदार उपेश अंबादे , मंडळ अधिकारी भास्कर बेले , हिंदलाल ऊके , संजय तोटे , उपसभापती श्रीरामे , कैलास हूडमे , तलाठी पडोळे , कोठे, डोये , कर्मचारी रंगारी , व इतर महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.