येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : तालुक्यात दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता अधिकच वाढत चालली असून सार्वजनिक ठिकाणी असलेले पाण्याचे पाणवठे कोरडे पडण्यास सुरुवात झाली असून उन्हाळ्यात मुक्या पक्षांना आपली तहान भागविण्यासाठी ठिकठिकाणी भटकंती करावी लागत असते.
येवला तालुक्यातील सायगाव रामवाडी वस्तीवरील पक्षी प्रेमी मयूर खैरनार यांनी पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या तसेच पाण्याविना तळपणाऱ्या एका पक्षाचा पाणी पाजून त्या पक्षाची तहान भागवित पाण्याविना भर उन्हात होणारी पक्ष्यांची हेडंसाळ बघून घराभोवती असणाऱ्या झाडांवर ठिकठिकाणी पाणवठे सुरू केले असून यात नित्यनेमाने अनेक प्रकारचे पक्षी येऊन आपली तहान भागवित असल्याचे दिसून आले आहे.
उन्हाळा सुरू झाल्याने विहिरीतील जलसाठा दिवसेंदिवस झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यातच ऊन जास्त पडू लागल्याने माणसाबरोबर प्राणी पक्षाना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सायगाव येथील रामवाडी वस्तीवरील प्रगतिशील शेतकरी मयूर खैरनार तसे पक्षी प्रेमी पक्षांविषयी प्रेम आणि कुतुहुल त्यांचा आवडीचा विषय सध्या सर्वच शेतकरी विहिरीतील जलसाठा कमी झाल्याने शेतात कांदा पिकाला पाणी भरण्याच काम सर्वच शेतकरी करत आहे. मयूर खैरनार शेतात कांदा पिकास पाणी भरत असताना एक पक्षी पाणी पिण्यासाठी तडफडताना दिसला तात्काळ पक्षी प्रेमी मयूर खैरनार यांनी त्या पक्षाला पाणी पाजून जीवदान दिले निसर्गात प्राणी पशु पक्षी सर्वच विहार करत असतात परंतु जीवन जगत असताना पाणी हे अगदी महत्वाचे म्हणजेच जीवनाचे अमृत आहे असेच म्हणावे लागेल मयूर खैरनार यांनी पक्षाला जीवदान देऊन नक्कीच भूतदया आणि पक्षावरील प्रेम सिद्द केले आहे समाजामध्ये जीवन व्यतीत करत असताना सामाजिक मदत ते नेहमीच करत असतात अशातच त्यांच पक्षी प्रेम हे तरुणांसाठी आदर्श म्हणावा लागेल त्यामुळे सर्वांनकडूंन त्यांचे कैतुक होत आहे.