भुसावळ:
महानिर्मितीच्या बाहयगृह क्रीडास्पर्धांचे उद्घाटन औष्णिक विद्युत केंद्र भुसावळ येथे ३ मार्च रोजी थाटात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे हे होते तर कार्याध्यक्ष म्हणून श्री. विवेक रोकडे मुख्य अभियंता ६६० प्रकल्प यांची उपस्थिती लाभली.
उद्घाटन सोहळ्यामध्ये पारस,खापरखेडा,चंद्रपूर, कोराडी,पोफळी,उरण, नाशीक,नवी करणीय ऊर्जा, भुसावळ,परळी,मुख्यालय इ. महानिर्मितीच्या विविध विद्युत केंद्रांचे संघ सहभागी झाले,त्यात क्रिकेट,बास्केटबॉल,कबड्डी,व्हॉलीबॉल व अथेलेटीक्समध्ये थाळीफेक, गोळाफेक,रनिंग, लांब उडी,उंच उडी इ. खेळांचा समावेश आहे. प्रमुख उपस्थितीत उपमुख्य अभियंता श्री.नितीन पुणेकर,सुनील रामटेके,सुनील इंगळे व प्रभारी उप मुख्य अभियंता श्री मधुकर पेटकर यांची तसेच अधीक्षक अभियंता श्री.चिंतामण निमजे,मदन अहिरकर, दिलीप जाधव,महेश महाजन,गजलरवार ,डाँ. प्रशांत जाधव,शांताराम पाटील,औदयोगिक संबंध अधिकारी श्री मुकेश मेश्राम ,दत्तात्रय पिंपळे,बाबरे,राणे,प्रधान सुरक्षा विभागाचे पाटील यांच्यासमवेत विद्युत केंद्र भुसावळचे विविध विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी,पत्रकार कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले तर समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे यांच्या हस्ते महानिर्मितीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले, त्यापाठोपाठ मान्यवरांना स्पर्धेमध्ये सहभागी महानिर्मितीच्या विद्युत केंद्राच्या संघांकडून सलामी देण्यात आली.
भुसावळ विद्युत केंद्राच्या राष्ट्रीय खेळाडूंकडून मैदानामध्ये आणलेल्या मशालीद्वारे अध्यक्ष व मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे यांच्या शुभ हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करून उद्घाटन केले. क्रीडाज्योत राष्ट्रीय खेडाळू श्री मनोज जमदाळे,संदीप वाघ,विनोद भिरुड,विश्वनाथ पावरा, नयन सागर मणी,ज्ञानेश्वर सहारे,दिगंबर गीते,सुभाष राठोड,सचिन भिरुड,राजेश शिंदे,संतोष जिरे यांनी आणली व आकाशामध्ये रंगीबिरंगी फुगे सोडून उत्साह द्विगुणित करण्यात आला.
याप्रसंगी शारदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व सजावट केलेल्या ओपन जीपने आलेल्या प्रमुख अतिथींचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आपल्या भाषणामध्ये ६६० प्रकल्पाचे मुख्य अभियंता श्री.विवेक रोकडे यांनी खेळांचे मुख्य लक्ष्य हार व जीत नसून कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य असल्याचे सांगितले. खेळांमधून स्फूर्ती घेऊन आपल्या आस्थापनेच्या यशात वाटा देण्याचे याप्रसंगी सांगितले तर अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्य अभियंता श्री.पंकज सपाटे यांनी सर्व सहभागी चमू व उपस्थितांचे स्वागत करीत या खेळांमधून कर्मचाऱ्याच्या अंतर्गत गुणांना वाव देत सांघिक भावना सर्वांमध्ये रुजविण्याचा हेतू असल्याचे सांगितले तसेच सर्वांनी खेळ अंगीकरून स्वतःच्या स्वास्थ्यासोबतच विद्युत केंद्राच्या बरोबरच देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आव्हान याप्रसंगी केले तसेच भुसावळ औ.वि.केंद्र हे नफ्यात असलेले केंद्र आहे असे आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाचे मार्च पास व ध्वजारोहणाचे संचलन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. पुरुषोत्तम वारजूरकर यांनी केले. प्रास्तविक श्री मुकेश मेश्राम यांनी केले. भुसावळ औ.वि.केंद्राचे संघ व्यवस्थापक श्री मिलिंद खंडारे यांनी उपस्थित खेडाळूंना शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कल्याण अधिकारी पंकज सनेर यांनी केले.श्रद्धा कदम,एश्वर्या खोचे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री सचिन कवीतके,राजेंद्र निकम,संजय दराडे,यशवंत शिरसाठ, सुरेंद्र यावले,नितीन मांडवे,प्रफुल्ल आवारे,महेश वारुळकर इतर सर्वांनी परिश्रम घेतले.