• जागतिक महिला दिनी महा मेट्रो येथे महिला दिनाचा जागर
•
*नागपूर ०८ :* आज जागतिक महिला दिनाच्या शुभ मुहुर्तावर महा मेट्रो भवनातील सभागृहात मोठ्या उत्साहात महिला दिवस साजरा करण्यात आला. मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित सपत्नीक उपस्थित राहून मेट्रोत कार्यरत कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच, त्यांच्या कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. डॉ.दीक्षित महिलांना संबोधित करित म्हणाले कि, आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे असून घरदार सांभाळून ती तीचे काम चोखबजावत असते व त्यासाठी प्रत्येकच महिला कौतुकास पात्र आहे. यावेळी संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथुर, संचालक (वित्त) श्री.एस शिवमाथन तसेच इतर अधिकारी सपत्नीक उपस्थित होते.
फेटा बांधून महिलांनी केला मेट्रोने प्रवास :
सकाळचे १० वाजले फेटा बांधून ७०-८० महिलांचा समूह सिताबर्डी मेट्रो स्टेशन येथे एकत्रित झाला स्टेशन परिसरात इतर प्रवासी व मेट्रो कर्मचारी आश्चर्याने या समूहाकडे बघू लागले; निमित्य होतं महिला दिवसाचे 'स्वयंप्रभा' या समुहातील महिलांनी मेट्रोने प्रवास करत महिला दिवस साजरा करणार असल्याचे समजले. या महिलांनी सिताबर्डी ते न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यत प्रवास करत न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे महिला दिनाचे सामुहिक गीत गायन केले. तसेच विविध महिलांनी या ठिकाणी कविता, गीत व नाटकाचे सादरीकरण केले. या महिला समूहांनी मेट्रो स्टेशन येथे कार्यरत महिला लोको पायलट,ट्रेन अटेंडंट, स्टेशन कंट्रोलर, सुरक्षा रक्षक इत्यादी महिला कर्मचाऱ्यांना फुल देत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 'स्वयंप्रभा' संस्थेच्या सर्व वयोगटातील महिलांनी जीन्स पांढरे कुर्ते त्यावर फेटा आणि नथ असा आगळावेगळा पेहेराव केला होता.