सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना
ऑनलाईन फॉर्म भरून देण्याचे मुख्याधिकारी यांचे आवाहन
राजुरा/ प्रतिनिधी
कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई ,पुणे, इतर शहर व परराज्यातून किंवा परदेशातून आलेले विद्यार्थी किंवा नातेवाईक यांनी आपली सविस्तर माहिती ऑनलाईन फॉर्म मध्ये नगरपरिषदेकडे नोंदणी करावी, असे आवाहन राजुरा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जुही अर्शिया यांनी केले आहे.
कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे यावर प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून सहकार्य करावे असे आव्हान नगर परिषदेतर्फे करण्यात आलेले आहे. पुणे, मुंबईसह इतर राज्यात शिक्षणासाठी विद्यार्थी बाहेर गावी असतात. कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भाव नंतर बाहेरगावी परराज्यात शिकणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने स्व: गावी आलेले आहेत. शिवाय काही परदेशातून नातेवाईक स्व गावी परतले आहेत. मात्र याची नोंद झालेली नाही . विषाणूंचा प्रादुर्भाव इतरस्त्र होऊ नये. वैयक्तिक व कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सामाजिक सुरक्षेच्यादृष्टीने बाहेरगावावरून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपली माहिती नगर परिषदेतर्फे दिलेल्या ऑनलाईन फॉर्म मध्ये भरून देण्यात यावे. ही माहिती गोपनीय राहील. आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी विद्यार्थी, पालक व नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे. शिवाय काही लक्षणे असल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी जुही आर्शीया यांनी केलेले आहे.