अखेर पाच दिवसानंतर काढले परिपत्रक
कर्मचाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर
शिकाऊ उमेदवारांना सक्तीची सुट्टी
खापरखेडा-प्रतिनिधी/ सुनील जालंधर
संपूर्ण जगभर हाहाकार माजविलेल्या कोरोना वायरसने अनेक देश आपल्या विळख्यात आणले आहेत त्यामुळे संपूर्ण जगभर दहशत पसरली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच महानिर्मिती कंपनीच्या मानव संसाधन विभागाकडुन १९ मार्चला महानिर्मिती/मास/देयके/२६८४ क्रमांकाचे परिपत्रक प्रसिद्ध केले सदर परिपत्रकात विज केंद्रात कार्यरत ५०% अधिकारी, कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने कामावर हजर राहण्याच्या सूचना केल्या मात्र तब्बल पाच दिवसानंतर खापरखेडा औष्णिक विज केंद्र प्रशासनाला जाग आली असून २३ मार्चला परिपत्रक जारी करण्यात आले असून प्रशिक्षणार्थ्यांना ३१ मार्च पर्यंत सक्तीच्या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत एकूणच सदर परिपत्रकात शासनाच्या आदेशाची अवहेलना केल्याचा प्रकार उजेडात आला आहे त्यामुळे विज केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे
खापरखेडा औष्णिक विज केंद्रात जवळपास १५०० विज केंद्र कर्मचारी, २००० हजार कंत्राटी कामगार, ४०० शिकाऊ उमेदवार असे एकूण जवळपास ४००० हजार कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत मात्र कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत शिवाय मुख्य कार्यालयाचे आदेश असतांना रोटेशन पध्द्त लागू करण्यात आली नाही त्यामुळे सदर विज केंद्र प्रशासन आपत्तीकालीन व्यवस्थापनात किती गंभीर आहे हे दिसून येते.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता बाबतीत सर्व अत्यावश्यक सुविधा पुरविणे अपेक्षित आहे मात्र विज केंद्रात हॅन्ड वॉश, फिनाईल, नोज मास्क, सॅनिटाईझर, हात पुसण्यासाठी कापड आदि उपलब्ध नाही त्यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहे महानिर्मितीच्या मानव संसाधन विभाग कार्यालयाच्या वतीने 19 मार्चला परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले वीज केंद्रात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना ५०% रोटेशन पद्धतीने बोलविण्याच्या विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या मात्र सदर आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली येथील मुख्य अभियंत्यांच्या आदेशाने सदर परिपत्रकाची अंमलबजावणी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र कर्मचारी व संघटनांचा वाढता दबाब बघून २३ मार्चला मुख्य अभियंत्यानी एक परिपत्रक प्रसिद्ध करून प्रशिक्षणार्थ्यांना 31 मार्च पर्यंत सक्तीच्या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत शिवाय सर्व विभाग प्रमुखांचे बाहेरगावी जाण्याचे अर्ज अमान्य करण्यात आले आहे तसेच विज केंद्रात साफसफाई लक्षण दिसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ले व उपचार घेण्यासंदर्भात सुचविले आहे याशिवाय प्रगत कुशल व अप्रगत कुशल कर्मचारी ५०% रोटेशन पद्धतीने राहणार असल्याच्या सूचना केल्या आहेत.
वीज केंद्र कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत जनजागृती
कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती 23 मार्च सोमवार सायंकाळ सुरू केली आहे विज केंद्रा अंतर्गत असलेलं रुग्णालय सज्ज झाले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक दिशा-निर्देश देण्यात आलं आहे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना वायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासंदर्भात विशेष काळजी घेण्यासंदर्भात सुचविले जात आहे सुट्टी वरून परत आलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर न येता वसाहतीत 31 मार्च पर्यत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विभाग प्रमुख मुख्यालयी राहने आवश्यक
वीज केंद्रात कार्यरत अनेक विभागातील विभाग प्रमुख नागपूर, सावनेर, कामठी व अन्य ठिकाणा वरून दररोज ये-जा करतात विज निर्मिती अत्यावश्यक सेवा अंतर्गत येत संपूर्ण राज्यात आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हा विभाग प्रमुखासह वीज केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहने अपेक्षित आहेत नागपूर जिल्ह्यात कोरोना वायरसचे चार पाझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे नागपूरसह इतर ठिकानावरून येत असतांना त्यांना लागन होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहने गरजेचे आहे.