चंद्रपूर :-
आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. महिला कुठेही मागे राहता कामा नये या आग्रही मागणीला घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मायनिंग शाखेत मुलींना प्रवेश देण्यात यावा याकरिता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे हि मागणी त्वरित मार्गी लावण्याची विनंती केली आहे.
कुठल्या क्षेत्रात आपल्याला महिला मागे असल्याचे दिसून येत नाही. सैनिकी क्षेत्र देखील महिलांचा टक्का वाढला आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रत्येक शाखेत मुलींची संख्या लक्षणीय आहे. नव्हे तर बरोबरीत आहे. देशभरात खनिज उद्योगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शिवाय परदेशात सुद्धा या उद्योगाला भरभराटी आलेली आहे. परंतु या क्षेत्रातील अभ्यासक्रमात महिलांना स्थान नसल्यामुळे त्या नोकरी करण्यापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.
संरक्षण क्षेत्रातील तिन्ही दलांमध्ये मुलींच्या सहभाग प्रचंड वाढलेला दिसून येतो. असे असताना केवळ मायनिंग इंजीनियरिंग क्षेत्रात मुलींच्या प्रवेशाकरिता अपवाद का हे न उलगडणारे कोडे आहे. महत्वाचे म्हणजे देशात अनेक राज्यात माइनिंग इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात मुलींना प्रवेश दिला जातो. परंतु महाराष्ट्रात मात्र दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या विषयाची माहिती मिळताच गांभीर्याने विषय हाताळून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मॉर्निंग शाखेत मुलींना प्रवेशाकरिता परवानगी देण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे केली आहे.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात महाआघाडी सरकारचा माध्यमाने मुलींना न्याय देण्याकरिता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न शैक्षणिक सत्र सण 2020-21 मध्ये निकाली काढून मुलींना न्याय देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे. या मागणीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. महिला आमदार म्हणून महिलांचे प्रश्न सोडविण्यास कटीबद्ध असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी व्येक्त केले.