प्रतिनिधी:- विजय खैरनार, येवला.
निर्यात बंदी ने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येवला तालुक्यातील अंदरसूल येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर कांदा टाकून रस्ता चक्का जाम केला
येवला तालुक्यातील अंदरसुल येथे कांद्याचे बाजार गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक- औरंगाबाद महामार्गावर कांदा रस्त्यावर टाकून रास्ता रोको आंदोलन छेडले..उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही जास्त खराब हवामानाने कांदा उत्पादन कमी झाल्याने केलेला खर्चही वसुल होण मुश्कील झाल्याने शेतकरी संतापले
दोनशे रुपये ते बाराशे रुपये असा आज कांद्याचा भाव निघाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे टाकून रस्तावर चक्काजाम आंदोलन करून शासनाचा निषेध केलाय.. अचानक झालेल्या रस्ता रोको मुळे काही काळ तणाव निर्माण झाला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या... यावेळी पोलीस बंदोबस्त ही आला होता शेतकऱ्यांनी सर्कल यांना निवेदन देऊन काही वेळानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेतलेय.यावेळी उपस्थिती.मकरंद सोनवणे, झुंजारराव देशमुख, दिपक जगताप, तुळशीराम मेहतर, अशोक देशमुख,बाळु धुमाळ, सुरेश डुकरे, अक्षय दिघे ,अशोक एंडाईत, दिलीप चाकणर, बंडू मेहतर आदींसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते