Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०२, २०२०

'मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण' योजना राबवा

वनमंत्री संजय राठोड यांना इको-प्रो चे निवेदन
वन्यप्राण्यांकडून होणारे शेतपिक नुकसान टाळण्यास प्रभावी

चंद्रपूर: 
शेतशिवारातील वन्यप्राण्यांकडून होत असलेले शेतपीक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने राज्यात 'मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण' ही योजना वनविभागाने राबवावी या अशी मागणी वनमंत्री नामदार संजय राठोड यांचेकडे इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून या वनक्षेत्रात वाघ बिबटसह इतरहि वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. जंगलालगत तसेच जंगलव्याप्त गावातील शेतशिवारात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने हाती आलेले पीक सुद्धा वन्यप्राण्यांकडून नष्ट होत असते. याकरिता मागील पाच वर्षापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत येणाऱ्या गावात वनविभागाकडून शेतकरी बांधवांना सौर ऊर्जा कुंपण अनुदान तत्वावर देण्यात आले आहे. यामुळे शेतशिवाराततिल पिकावर येणाऱ्या रानडुक्कर, चितळ, सांबर वन्यप्राण्यांकडून होत असलेले पिकाचे नुकसान टाळण्यात यश मिळू लागलेले आहे आहे. 

मात्र ही योजना फक्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असून असून याची व्याप्ती चंद्रपूर जिल्ह्यात सहा सहा राज्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये व्हावी जेणेकरून शेतकरी बांधवांचे अस्मानी आणि सुलतानी संकटातुन वाचलेले पिक हे वन्यप्राण्यांकडून नष्ट होऊ नये आणि संकटात असलेल्या शेतकऱ्याला मदत होईल या अनुषंगाने सौर उर्जेचे कुंपण शेतकऱ्यास अनुदान तत्वावर देण्याची योजना 'मागेल त्या शेतकऱ्यास, सौर ऊर्जा कुंपण' ही योजना राबविण्याची मागणी इको प्रो चे चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी चंद्रपूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे वनमंत्री नामदार संजयजी राठोड यांना निवेदन देत केली आहे.

काय आहे सौर ऊर्जा कुंपन योजना

मला शेजारी राहणाऱ्या गावांमध्ये शेती पिकाचे गावांमध्ये शेती पिकाचे होणारे नुकसान शेतकऱ्यांना शेताभोवती सौर कुंपण लावण्यात येते. यात सोलर पैनल, बैटरी, तार याचा समावेश असतो. पिक नसेल तेव्हा सदर कुंपन काढून ठेवता येते. याकरिता येणाऱ्या एकूण खर्च 13 हजार पैकी प्रत्येक लाभार्थी शेतकरिस 10 हजार चे अनुदान देण्यात येते.

 यास आवश्यक घटक खरेदी करण्यास लाभार्थी स्वत: 3 हजार खर्च करतो. यामुळे शेतात येणारे वन्यप्राणी शेतपिक पासून दूर राहतात. शेतकाऱ्यास जागली जाण्याची गरज नसते. कोरडवाहु सोबत रबी व अन्य पीके घेणे सहज शक्य होते. याचे चांगले परिणाम बफर क्षेत्रात दिसून आले आहे. ताडोबा बफर च्या क्षेत्रात सुरु असलेल्या सौर ऊर्जा कुंपन योजनेतुन अनेक गावात शेतकरी बांधवाना वाटप करण्यात आलेले आहे.

बफर क्षेत्रात सौर ऊर्जा कुंपन चे वाटप

बफर क्षेत्रात सौर ऊर्जा कुंपन बाबत यापूर्वी वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले असून यात व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक शेतकरीला अनुदान तत्त्वावर या योजनेचा योग्य लाभ होत आहे. आतापर्यंत ताडोबा बफर क्षेत्रात 2015-16 ला 183, 2016-17 ला 646, 2017-18 ला 673 तर 2018-19 या वर्षात 563 लाभार्थी शेतकरिना वाटप करण्यात आले आहे. मात्र ही योजना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प च्या बफर क्षेत्रात सुरु आहे त्याची व्याप्ति संपूर्ण जिल्हा व्हावी बफर च्या बाहेरिल क्षेत्रात सुद्धा शेतकरिना अनुदान देण्यात यावे याकरिता यापूर्वी सुद्धा इको-प्रो ने आंदोलन केलेले आहे.

सौर ऊर्जा कुंपन मुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्यास मदत
जंगलव्याप्त व जंगलालगत असलेल्या शेतात शेतकरी काम करताना वाघाचे हल्ले होण्यापासून, पाळीव जनावरे यांचेवरील हल्ले टाळता येतील. शेतपिक वन्यप्राणी पासून संरक्षण व्हावे म्हणून शेतात लावण्यात येत असलेले जीवंत विद्युत प्रवाह यामुळे अनेक वन्यप्राणी सोबत या जिल्ह्यात वाघाचे मृत्यु झालेले आहेत याअनुशंगाने सुद्धा सदर योजना अत्यंत महत्वाची ठरू शकते.
शेतातील जीवंत विद्युत प्रवाह वाघास व मनुष्यास धोकादायक
वन्यप्राणी कडून शेतपिक नुकसान होत असल्याने शेत सभोवताल सरळ विद्युत प्रवाह सोडण्यात येत असल्याने यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात 4 तर वर्धा, नागपुर व गडचिरोली जिल्ह्यात एक-एक असे सात वाघाचे मृत्यु झालेले आहेत, अनेक वन्यप्राणी सोबत शेतकरी, शेतमजूर मनुषयहानी सुद्धा झालेली आहे. या दृष्टीने सुद्धा सौर ऊर्जा कुंपन अत्यंत महत्वाचे आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.