चंद्रपूर - आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश आले असून चंद्रपूर महानगर पालिकेतील कर्मचा-यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. सोमवार दि २ मार्च रोजी विधानभवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी या विषयावर आ. जोरगेवार यांची सत्कारात्मक चर्चा झाली असून मनपातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. लवकरच याबाबतचा आदेश पारित करण्यात येणार आहे. या बैठीकीला आ. किशोर जोरगेवार, नगर विकासचे उपसचिव सतीश मोघे, मनपा आयुक्त संजय काकडे, तथा संबधीत अधिका-यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर शहर महानगर पालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या विषयाच्या अनूषंगाने आज आ. जोरगेवार यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक पार पडली. यावेळी आ. जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगर पालिकेबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर माहिती दिली.
या बैठीकत आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर महानगर पालिका सुदृढ व संपन्न स्थितीत आहे. चंद्रपूर मनपा अस्थापनेचा खर्च हा 35 टक्केपेक्षा कमी आहे. त्यामूळे येथील कर्मचां-या सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी केली. दरम्यान या बैठकीत चंद्रपूर महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत सर्व शक्यतांची चाचपणी करण्यात आली. तसेच यावेळी आ. जोरगेवार यांची एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. चर्चे अंती येथील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामूळे मनपा कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मनपा कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी आ. जोरगेवार प्रयत्नशील होते. अधिवेशना दरम्यानही त्यांनी हा विषय सभागृहात रेटून धरला होता. त्यांच्या याच प्रयत्नांना आता फलीत आले असून चंद्रपूर मनपा कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश लवकरच पारीत करण्यात येणार आहे.
घंटागाडी व सफाई कर्मचा-यांच्या समस्यांवरही सकारात्मक चर्चा
२००२ पासून सफाई व घंटागाडी कंत्राटी कामगार काम करीत आहेत. दि. २४ फेब्रुवारी २०१५ ला शासन राजपत्र अधिसूचनेनुसार महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कामगारांना नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे अश्या पद्धतीचे निर्णय शासनाने जारी केले होते, परंतु चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या सफाई व घंटागाडी कामगारांना या नियमानुसार किमान वेतन दिल्या जात नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या सुविधा कंत्राटदारा मार्फत देण्यात येत नाही अश्या अनेक तक्रारी सतत सफाई व घंटागाडी कामगारांकडून केल्या जात असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सांगीतले१७ मार्च २०१९ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सफाई कामगारांना किमान वेतन लागू करण्याचा शासननिर्णय जारी केला परंतु चंद्रपूर मनपाने लागू केलेल्या शासन निर्णयानुसार कामगारांना वेतन दिले नाही. चंद्रपूर महानगरपालिकेकडे घंटा गाडी कामगार १९८ कार्यरत आहे तसेच चंद्रपूर मनपा अंतर्गत ३२८ कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत होते परंतु २२० सफाई कामगारांना कामावर ठेऊन अन्य १०८कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे त्यामूळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून त्यांना किमान वेतन लागू करावे अशी मागणीही या बैठकीत आ. जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.