कर्नाटका पाॅवर कार्पोरेषन व व्हीडीओकाॅन कंपनी वरोरा येथील कामगारांच्या थकीत वेतनाबाबत आज दिनांक 16 मार्च 2020 ला जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे सभागृह खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे अध्यक्षतेखाली व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधींना व प्रषासकीय अधिका-यांना या कामगारांच्या समस्या तातडीने सोडविण्याकरिता गतीने कामाला लागण्याच्या सूचना खासदार धानोरकर यांनी दिल्यात.
केपीसीएल ने बंद केलेली माईन्स सुरू करणे अन्यथा कंपनी कामगारांना दिनांक 1/04/2020 पासुन पष्चिम बंगाल सरकारच्या धर्तीवर नियमीत वेतन सुरू करावे या मागणीवर कर्नाटका एम्टा कोल माईन्स पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक भुमीका कंपनीची असल्यामुळे कोल इंडियाच्या परवानगीसाठी प्रकरण थांबलेले असून याकरिता मा.खासदार बाळुभाऊ धानोरकर, मा.सचिव,कोल इंडिया भारत सरकार यांचे सोबत केपीसीएलचे अधिकारी, कर्नाटका एम्टा व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासह बैठकीचे आयोजन करून तोडगा काढण्याचे ठरले तसेच कंपनीच्या मालमत्तेच्या सुरक्षीततेसाठी सुरक्षा रक्षकांची कंपनीतर्फे नेमणूक करण्याबाबतच्या मुद्दयांवर कंपनी तर्फे व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देवुन आवष्यकतेनुसार कामगारांपैकी सुरक्षा रक्षक म्हणुन नियुक्ती पत्र द्यावे असे खासदार धानोरकर यांनी सांगितले.
व्हिडीओकाॅन कंपनीतील नियमीत कामगारांना नियमीतपणे रोजगार दिल्या जात नाही. कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन बाकी असल्यामुळे व 25 कामगारांची सेवानिवृत्ती असल्यामुळे त्यांचे सेवानिवृत्तीचे वेतन निष्चित झालेले नसल्याबाबतच्या मुददयांवर दिल्ली येथे आय.आर.पी.चे वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठकीचे आयोजन करून जिल्हा प्रषासनाला व्यवस्थापक व्हीडीओकाॅन कंपनी यांनी कळवावे असे निर्देष खासदार बाळु धानोरकर यांनी दिले.
या बैठकीला खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर,डाॅ.कुणाल खेमणार जिल्हाधिकारी चंद्रपूर, केपीसीएलचे गौंड अषोक, उपजिल्हाधिकारी लोंढे, सहायक श्रम आयुक्त एस.आर. शिंदे , पदाधिकारी रितेष तिवारी, संतोष लहामनगे, गोपाल अमृतक,तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून राजू डोंगे, किशोर पुनवटकर, नितीन चालखुरे, विनोद मत्ते, अहंगोविंद कुशवार्ह, धीरज पुनवटकर, अमरदीप मशाखेत्री यासह प्रकल्पग्रस्त व व्हिडीओकाॅन कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.