चंद्रपूर:
शेतकरी आत्महत्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीन आयोजित करण्यात आलेला 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' हा उपक्रम सामूहिकरित्या करण्या ऐवजी तो वैयक्तिक पातळीवर करावा असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात कोरोना व्हायरसच्या निमित्ताने जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या कारणास्तव सार्वजनिक उपवास करण्या ऐवजी वैयक्तिक उपवास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे नागरिक या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यांनी अन्नत्याग केल्याबाबतचे निवेदन फोटोसह समाज माध्यमावर प्रसिद्ध करावे अशी सूचनाही करण्यात आली आहे
१) वैयक्तिक उपवासाचे आवाहन करावे.
२) या आवाहनात, एकत्र बसून यंदा उपोषण का करू शकत नाही, हेही सांगावे
३) वैयक्तिक उपवास करणाऱयांनी आपल्या घराच्या गेटवर : १९ मार्च- अन्नदात्यासाठी अन्नत्याग : असे लिहिलेले फलक लावावे
४) या फलकासोबत पूर्ण कुटुंबाचा फोटो सोशल मीडिया वर टाकावा.
ह्याचं दिवशी सायंकाळी सांगता समारंभाचे कार्यक्रम टाळावेत. असे आवाहन करताना मयूर बागुल यांनी स्पष्ट केले आहे की, उपवास हा आपला मुख्य कार्यक्रम आहे. वैयक्तिक बांधीलकीला महत्व आहे. म्हणून जास्तीजास्त लोकांनी वैयक्तिक उपवास करून या अभियानात सहभागी व्हावे. त्या दिवशी जास्तीजास्त फोटो आणि व्हिडीओ फेसबुक व व्हॅटसअँप वर टाकावेत.
असे आवाहन किसानपुत्र फाउंडेशन, जनसेवा विकास सेना , युथ चांदा ब्रिगेड, आम आदमी पार्टी, कुणबी समाज मंडळ , नाते आपुलकीचे, ओबीसी फे डरेशन, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेन्ट , इको प्रो, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी कुणबी संघटना, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समीती चंद्रपूर, शिवरत्न सेना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ ऑफ चांदा, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, आंदीनी केले आहे.