- कोरोणा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पाऊल..
- महाराष्ट्र व तेलंगणा पोलिसांची गस्त...
राजुरा/ प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोणा विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेल्या आवाहनास जनता कर्फ्यूस राजुरा तालुक्यातील नागरिकाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला .
आंतरराज्यीय वाहतूक ठप्प होती . महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट येथील चेक पोस्ट नाका रात्रो बारा वाजताच सील करण्यात आला. त्यामुळे सकाळपासूनच वाहतूक ठप्प होती. शहरातील सर्व दुकाने बंद होती. प्रत्येक वार्डात शुकशुकाट होता. सुट्टीचा दिवस असून सुद्धा कुणीही नागरिक किंवा मुले रस्त्यावर निघाली नाहीत. सकाळी सात वाजता पासून संपूर्ण शहर निर्जन झाले होते.
पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा कार्यरत होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कोरोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी राबवत असलेले डॉक्टर, नर्स, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचारी या सर्वांसाठी टाळ्या वाजून अभिनंदन करण्याचे आवाहन करण्यात आले होते .त्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक वार्डात नागरिकांनी टाळ्या वाजवून आभार प्रकट केले.
कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार बघता नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे . जनता कर्फ्यू एक दिवसासाठी होता .मात्र सोमवारपासून नागरिकांनी स्वतः व कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी अनावश्यक घराबाहेर पडू नये. असे आवाहन तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांनी केले आहे.
......................
मुंबई पुण्यातून आलेले विद्यार्थी
देखरेखेखालीपरराज्यात , मुंबई व पुणे येथे शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने स्व:गावी आलेले आहेत. शहरात आलेल्या विद्यार्थ्यांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे .बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी दोन आठवडे घराबाहेर पडू नये असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. लहू कुळमेथे यांनी केलेले आहे.