नागपूर/ प्रतिनिधी
दोन दिवसानंतर होळीचा सण येत आहे . त्याचे निमित्त साधून पर्यावरणपूरक होळीकरिता मानेवाडा मार्गावरील सिद्धेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेणा पासून चकोल्या तयार केल्या. राष्ट्रीय हरित सेनेचा उपक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होली साजरी करण्याचे आवाहन केले आहे. सिद्धेश्वर विद्यालयात राष्ट्रीय हरित सेनेची शाखा कार्यरत आहे हरित सेलच्या सभासदांना शिक्षक सुनील येटरे यांनी पर्यावरणपूरक होळीकरिता साहित्य तयार करण्यास आवाहन केले होते. होळीमध्ये लाकडे जाळून होळी पेटविण्यात येते. जंगलातील पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. ते टाळण्याकारता मुख्याध्यापिका सौ. सुनीता लांङे यांच्या मार्गदर्शनात हरित सेनेच्या सभासद विद्यार्थी यांनी पर्यावरणीय चकोल्याची माळ होळी पेटविण्यात उपयोगात आणली जाणार आहे.
सौ. मंजुषा डोंगरवार मॅडम व इतर शिक्षकांच्या सहभाग या उपक्रमात होता.