मैत्रिणींनो!एक गोष्ट शेअर करावीशी वाटतेय. काही दिवसांपासून मी आपल्या नागपूरच्या धंतोलीतील एका फिजीओथेरेपीस्ट कडे पाय दुखतात म्हणून फिजीओसाठी चार पाच दिवसांपासून जात होते.मी रोज जायचे एक बेडवर झोपली की तिथला असिस्टंट मला पायाला वजन,कोल्डपँक,पायाखाली उषा,वाळूच्या उशा असा सगळा तामझाम तो मला लावत असे.मग मला पंधरा पंधरा मि.एक एक व्यायाम करायला सांगितले गेले. मी अगदी बरोबर न चुकता ते व्यायाम करत होते.घरी आल्यानंतर पण मी रेग्युलर ते व्यायाम करत होते.पण या संपूर्ण दिवसांमधे तो असिस्टंट मला कशाप्रकारे पायाला पट्टे बांधतो हे मी कधीच बघितले नव्हते.
डॉ. मला रोजच रागवतच होत्या. बरोबर चालत नाही, भरभर चालते,सरळ पाय टाकत नाही, असे काहीबाही रोज रागवतच होत्या मी गालातल्या गालात हसून टाळत होते.दुखणे अंगात असले की रोग्यांना वाटतं कुणी रागावू नये.पण...इथे उलटच..एकदिवस सकाळीच मी उत्साहात तेथे पोचले.शनिवारी सायंकाळी बंद असतं सेंटर म्हणून सकाळीच फिजीओथेरपी होते.कुठलाच बेड खाली दिसत नव्हता.गर्दी दिसत होती।पण लगेच एक बेड खाली झाला. मी तिकडे जाऊ का असे डॉ.मँमला विचारले तर,एकदम ओरडल्या माझ्या अंगावर." काय घाई आहे,रहा म्हटले नं इथे उभे,उशिरा यायचं आणि लगेच घाई करायची...मी सांगत नाही तोवर नाही जायचे.थांब इथेच."असं बोलता बोलता माझ्या हातात पाच सहा कि. वजनाचे पट्टे थमवून,"आता जा हे घेऊन"असे ओरडतच बोलल्या. मी इकडेतिकडे बघितले नीलमदादा (असिस्टंट) आलाय का ते,पण ते कुठेच दिसले नाही. म्हटलं आज आले नाही वाटतं ते.मी बेडवर सगळं ठेवलं आणि बसली.वाटलं मँडम येतील आणि मला सर्व पट्टे लावून देतील.तेवढ्यात सोनारे नावाच्या एक पेशंट मला हळूच आवाजात सांगतच होत्याकी आज मँडम खुप चिडचिड करुन राहिल्या आहेत.एकटीवर सगळं पडलय म्हणून गरम झाल्या आहेत.मी ऐकतच होती.तेवढ्यात मँडम आल्या आणि ,"अरे तु अजून बसलेलीच.तु बसायला आली आहेस का?लावता नाही आले का पट्टे तुला पायाला? चल लाव ते पट्टे.अशा एकदम वरच्या पट्टीतच माझ्या वर ओरडल्या.मी पाय वर घेतले आणि वजनाने पट्टे उघडण्यासाठी बघतच होती तर,खसकन माझ्या हातातून मँडम नी ते पट्टे हिसकले.
"काय मुर्ख आहेस तु.तुला साधे पट्टे लावता येत नाहीत का?बावळट कुठली,ब्रेन सेंस काही असतो की नाही.शेवटी मलाच सगळं करावं लागणार.माझ्याच भरवश्यावर बसत जा नेहमी." असं जोरजोरात रागवत अचानक माझ्या गालावर जोरदार चापट मारली.मी शॉकच झाले. दोन मि.काही कळलेच नाही.माझ्या डोळ्यात आपोआप पाणी येत होते.एवढं करुनही बाईच्या तोंडाचा पट्टा सुरुच.खसखस करत मला पायाला सगळे पट्टे बांधले आणि ,"हममम आता बसा मुळूमुळू रडत.दुसरं काही नाही येत तुम्हाला. बिनडोक. देवाने ब्रेन दिलय ते फक्त शो साठीच वाटतं."मी म्हटलं मँम मी कधीच नीलम दादाला पट्टे कसे बांधतो हे बघितले नाही. त्यामुळे काय पद्धत आहे बांधण्याची ते पण मला माहित नाही. मग मी मनानेच हे पट्टे कसे काय बांधू."
तर म्हणे,"तु घरी बांधत असशील ना हेच पट्टे?"
म्हटरं ते पट्टे जरा वेगळे आहेत.नवीन प्रकारचे.ते मी बांधते.पण हे तुमचे पट्टे जरा वेगळे आहेत.शिवाय स्पंज पण टाकावे लागते.तर म्हणे,"मला शिकवतेस.माझा जन्म गेला या प्रोफेशन मधे.सगळे पट्टे सारखेच असतात. तुलाच अक्कल नाही साधी." इतकं बोलली ती की मी घळाघळा रडत होती।माझ्या डोळ्यातून अखंड धारा गळत होत्या. कंठ दाटून आला होता.जोरजोरात हुंदके देत रडावेसे वाटत होते. तेवढ्यात सोनारे ताई जवळ आल्या आणि माझ्या पाठीवरुन मायेने हात फिरवत मला समजावत होत्या. रडू नकोस गं. तशाच आहेत त्या. सगळ्यांना रडवतात.जाऊ दे.शांत हो." त्या हे सगळं होताना बघतच होत्या .त्या साक्षीदार आहेत.खरच माझी यात काही चुक आहे का?
मी अखंड रडतच होती. काहीकेल्या माझे अश्रू थांबतच नव्हते. खुप रडली मी त्यादिवशी. जातांना डॉ.मला म्हणते."खुप तमाशा केलास तु आज." मी तिच्या तोंडाकडे बघतच राहिली.मनात म्हटलं माय मी तर अगदी चुप होती.आणि लपूनछपून रडत होती.मग तमाशा मी केला की तु? त्यादिवशी सायंकाळी माझा प्रोग्राम होता.मला स्टेजवर परफॉर्मन्स करायचा होता.मी सकाळी खुप उत्साहात फिजीओला गेले होते. पण येतांना... घरी आल्यावर तर मला रहावलेच नाही. हेमंतच्या कुशीत दडून हुमसून हुमसून रडले.डोळे सुजून गेले होते रडून. त्यांनी मला शांत केले.पाणी पाजले.चल म्हणे आताच जाऊ आणि तिची खरडपट्टी काढतोच.आणि पोलीस कंप्लेंट पण करतो.पागल झाली आहे का बाई अशी दुखाऱ्या पेशंटला मारते.बावळट कोण आहे ते दाखवतोच म्हणे तिला.खुप चिडले होते हेमंत आणि प्रजोतपण...मीच म्हटलं आता राम राम त्या भवानीला.
तुम्ही च सांगा डॉक्टरांने पेशंटसोबत असं वागतात का? ऐकत नसला तर गोष्ट वेगळी आहे पण काहीही चुक नसतांना.... तुझ्या कामाच्या व्यापाचा राग तु असा पेशंटवर काढतेस.वयाचा तरी विचार करायला हवा होता त्या बाईनी.इतर पेशंटना सुद्धा अशीच करते.घालून पाडून बोलत राहाते.खोऱ्याने पैसा ओढते आहे. फिजीओथेरपी सेंटरला आपण जातो तर तिथे कुठलेही उपकरणं तुम्ही स्वतःच लावून घेता का? आपण डॉ आहोत की पेशंट? मला खात्री आहे ते पट्टे मी माझ्या मनाने लावण्याचा आधीच प्रयत्न केलाही असता तरी मी मार खाल्ला असता.पण तुम्ही च सांगा हे कसं कुठल्याही डॉ चे पेशंटला चापट मारणे तेही कुठलीही चुक नसताना बरोबर आहे का??यात माझी काही चुक आहे का? मी रोज दोनशे रुपये फीस स्वतःच पट्टे बांधून घेण्यासाठी देत होते का? मला एवढे ज्ञान असते तर मी दवाखान्यात कशाला गेली असती.घरीच करुन घेतले असते उपचार.त्या खडूस डॉ चे वागणे बरोबर होते की चुक ह्याचे उत्तर मला हवे आहे.डॉ.चं नाव मी सांगेनच. उहापोह झाल्या नंतर.
💁🏻♀️अनुराधा हवालदार
(आलेल्या अनुभवातून सदर लेख लिहलेला आहे...)